India vs South Africa 1st T20I : भारताने कटक येथे झालेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 101 रननी शानदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 आऊट 175 रन्स केले होते. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला 12.3 ओव्हरमध्ये 74 रन्सवरच ऑल आऊट केले.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा आजपर्यंतचा सर्वात कमी स्कोअर आहे. जसप्रीत बुमराहने या सामन्यात 100 टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आणि तो तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा पहिला भारतीय बॉलर बनला आहे.
हार्दिक दमदार पण इतरांची निराशा
टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. दुखापतीनंतर कमबॅक केलेला व्हाईस कॅप्टन शुबमन गिल
पहिल्याच ओव्हरमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 2 बॉलमध्ये 1 चौकार मारून फक्त 4 रन केले.यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानं 11 बॉलमध्ये 12 रन केले,
2 विकेट्स झटपट पडल्यानंतर दबावात आलेला अभिषेक शर्मा हवाई शॉट खेळण्याच्या नादात आऊट झाला. त्यानं 12 बॉलमध्ये 17 रन्स केले. यानंतर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिलकची 32 बॉलमध्ये 26 रनची खेळी खूपच संथ होती.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction : जडेजाला रिलीज केल्यानंतर CSK ची मोठी चाल; 'या' 5 तगड्या खेळाडूंना करणार लिलावात टार्गेट )
अक्षर पटेलने 21 बॉलमध्ये 1 सिक्सच्या मदतीने 23 रन केले. त्याने हार्दिक पांड्यासह 14 बॉलमध्ये 26 रनची पार्टनरशिप केली. अक्षर आऊट झाल्यानंतर आलेल्या शिवम दुबेने 9 बॉलमध्ये 11 रन केले आणि हार्दिकसोबत 19 बॉलमध्ये 33 रनची पार्टनरशिप केली. मात्र, हार्दिक पांड्याने* एक बाजू लावून धरत त्याचा क्लास दाखवला.
हार्दिकने 28 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 59 रन केले. त्याने यावेळी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याचे 100 सिक्सही पूर्ण केले. विकेटकीपर जितेश शर्माने 5 बॉलमध्ये नाबाद 10 रन केले.
आफ्रिकेचा फ्लॉप शो
176 रनचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर भारतीय बॉलर्सनी पहिल्या ओव्हरपासूनच लगाम लावला.अर्शदीप सिंग पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर क्विंटन डी कॉकला शून्यावर आऊट केले. यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीपने ट्रिस्टन स्टब्सला (9 बॉलमध्ये 14 रन) जितेश शर्माकरवी कॅच आऊट करून दुसरा झटका दिला.
पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने कॅप्टन एडेन मार्करामला (14 बॉलमध्ये 14 रन) बोल्ड केले. पॉवरप्ले संपताच कॅप्टन सूर्याने बॉल हार्दिक पांड्याकडे सोपवला आणि त्याने बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही लगेच फॉर्मात असल्याचं दाखवलं. त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर धोकादायक डेव्हिड मिलरला फक्त 1 रनवर आऊट केलं. यानंतर वरुण चक्रवर्तीने डोनोवन फरेरा (5 रन) आणि *मार्को यानसेन (12 रन) यांना आऊट करून द. आफ्रिकेला अडचणीत आणले.
जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक सेंच्युरी
ड्रिंक्स ब्रेकनंतर, 11 वी ओव्हर घेऊन आलेल्या जसप्रीत बुमराहने लगेच आपली कमाल दाखवली. त्याने ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर डेवाल्ड ब्रेविसला (22 रन) आऊट केले. या विकेटसोबतच बुमराहने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या. या कामगिरीमुळे तो तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा भारताचा पहिला बॉलर बनला.
One & Only ➡ India's 𝐆𝐎𝐋𝐃𝐄𝐍 🦾 pic.twitter.com/1Ib99jS5M2
— Mumbai Indians (@mipaltan) December 9, 2025
बुमराह इथेच थांबला नाही. त्याने त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर *केशव महाराजला* (0) आऊट केले. यानंतर अक्षर पटेलने एनरिक नॉर्टजेला बोल्ड केले, तर शिवम दुबेने लुथो सिपामलाला आऊट करून दक्षिण आफ्रिकेची इनिंग संपुष्टात आणली.
An emphatic win in the #INDvSA T20I series opener 🥳#TeamIndia register a 1⃣0⃣1⃣-run victory in Cuttack to go 1⃣-0⃣ up 🙌
— BCCI (@BCCI) December 9, 2025
Scorecard ▶️ https://t.co/tiemfwcNPh@IDFCFIRSTBank pic.twitter.com/mw3oxC5AHw
भारताकडून अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world