India vs Australia, Boxing Day Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टेस्ट मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानात होणार आहे. या सीरिजमधील पाच पैकी तीन टेस्ट आत्तापर्यंत संपल्या आहेत. तीन टेस्टनंतर दोन्ही टीम 1-1 नं बरोबरीत आहेत. त्यामुळे मेलबर्न टेस्टला मोठं महत्त्व आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियानं आत्तापर्यंत प्रत्येक टेस्टमध्ये प्लेईंग 11 मध्ये बदल केलाय. त्यामुळे भारतीय टीम बॉक्सिंग डे टेस्टमध्ये कोणत्या प्लेईंग 11 सह उतरते याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा 'गाबा टॅक्स' संपणार का? असा प्रश्न आता क्रिकेट फॅन्स विचारत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे गाबा टॅक्स?
भारतीय क्रिकेट टीमनं 2021 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इतिहास घडवला होता. त्या सीरिजमधील शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमधील गाबा या मैदानात झाली. गाबावर त्यापूर्वी 33 वर्ष ऑस्ट्रेलियन टीम पराभूत झाली नव्हती. भारतानं ती परंपरा खंडित केली.
भारताच्या त्या विजयात टीम इंडियाचा फ्युचर स्टार समजला जाणाऱ्या शुबमन गिलचं (Shubman Gill) मोलाचं योगदान होतं. त्या टेस्टमधील चौथ्या इनिंगमध्ये गिलनं 146 बॉलमध्ये 91 रन काढले होते. त्या खेळीनंतर गिलची टेस्ट टीममधील जागा पक्की झाली. त्याची थेट विराट कोहलीशी तुलना होऊ लागली. विराटचा वारसदार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात होतं.
( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )
गाबामधील त्या टेस्टला आता चार वर्ष उलटली आहेत. गेल्या चार वर्षात गिलचा आशिया खंडाच्या बाहेर सर्वोच्च स्कोअर आहे 36. गिलला गेल्या चार वर्षात भारतीय उपखंडाच्या बाहेर टेस्ट क्रिकेटमध्ये हाफ सेंच्युरी सोडा चाळीशी देखील गाठता आलेली नाही.
28, 8, 17, 4, 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 31, 28, आणि 1 असे रन्स त्यानं भारतीय उपखंडाच्या बाहेर खेळलेल्या टेस्टमध्ये काढले आहेत. आशिया खंडाच्या बाहेरील त्याची सरासरी 17.73 इतकी आहेत. तर टेस्ट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 31 टेस्ट खेळल्यानंतरही त्याची सरासरी 35.76 इतकी आहे.
PRince Shubman Gill oustide Asia since Gabba 91:
- 28, 8, 17, 4, 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 31, 28, 1
He has avg of 17.73 outside Asia since Gabba and and overall avg of 36 after 30 tests and he is still in team. Shikhar Dhawan & Mayank Agarwal got dropped with 40+ avg. pic.twitter.com/hpthG3HeYH
— Rajiv (@Rajiv1841) December 16, 2024
सातत्यानं ओपनिंग आणि तीन नंबरवर खेळणाऱ्या आणि फ्युचर सुपरस्टार समजल्या जाणाऱ्या खेळाडूसाठी ही अभिमानास्पद सरासरी नाही. चार वर्षांपूर्वी गाबामध्ये खेळलेल्या एक इनिंगच्या जोरावर त्याची अंतिम प्लेईंग 11 मधील जागा कायम आहे. त्यामुळेच त्याच्या टीममधील समावेशाचं वर्णन 'गाबा टॅक्स' असं भारतीय फॅन्स करत आहेत.
Taxes in India
— Honest Gill Fan (@gillverse) December 13, 2024
Income Tax
Wealth tax
Excise
Custom
VAT
GST
Gabba Tax https://t.co/WZ69aieKAG pic.twitter.com/8HOxwRIzPN
मेलबर्नमध्ये कशी असेल प्लेईंग 11?
मेलबर्नमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) प्लेईंग 11 मध्ये समावेश होईल, अशी चर्चा आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये सुंदरनं टीम इंडियात पुनरागमन केलं. त्या सीरिजमधील पुणे टेस्ट सुंदरनं गाजवली. त्यानंतर हेड कोच गौतम गंभीरचा सुंदरवरील विश्वास वाढला असं मानलं जातंय. या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्येही टीम मॅनेजमेंटनं आर. अश्विनच्या जागी सुंदरला पसंती दिली होती. नियमित कॅप्टन रोहित शर्मा त्या टेस्टसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे सुंदरच्या समावेशाचा निर्णय गंभीरचा होता असं समजायला वाव आहे.
मेलबर्नचे पिच स्पिन बॉलिंगला मदत करणारा असेल तर भारतीय टीम दोन स्पिनर्ससह या टेस्टमध्ये उतरु शकते. त्यामुळेच रविंद्र जडेजासह वॉशिंग्टन सुंदरचा समावेश होण्याची शक्यता आहे. सुंदरचा समावेश कुणाच्या जागी होणार हा प्रश्न आहे.
( नक्की वाचा : 'BCCI शी चर्चा झालीच नव्हती,' 'या' खेळाडूच्या निवडीमुळे अश्विननं केली निवृत्तीची घाई? )
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात अनुभवी बॅटर सध्या फॉर्मात नाहीत. या सीरजमधील पर्थमधील शतकी खेळीचा अपवाद वगळता यशस्वी जैस्वाललाही मोठी खेळी करण्यात अपयश आलंय. त्यामुळे गिलला वगळल्यास प्लेईंग 11 मधील टॉप ऑर्डर दुबळी होईल असा विचार टीम मॅनेजमेंट करु शकतं. त्याचबरोबर मेलबर्नचं पिच गिलच्या बॅटिंगसाठी उपयुक्त असल्याचं मानलं जातं. त्यामुळे गिलला आणखी एक संधी दिली जाऊ शकते.
शुभमन गिलचा समावेश नक्की असेल तर या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीवर वॉशिंग्टन सुंदरसाठी बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.
( नक्की वाचा : काय आहे Boxing Day Test? ती दरवर्षी 26 डिसेंबरलाच का सुरु होते? वाचा सर्व माहिती )
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेट किपर), रोहित शर्मा (कॅप्टन), रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर / नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world