Jasprit Bumrah vs Sam Konstas; IND vs AUS 5th Test: ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्या झुंजार बॅटिंगनंतरही सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाला मोठा स्कोअर करता आला नाही. भारतीय टीम 185 रनवरच ऑल आऊट झाली. त्यानंतर शेवटची काही मिनिटे बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनर सॅम कोन्स्टास शांत बसला नाही. त्यानं बुमराहचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. सॅमच्या खुन्नसला टीम इंडियाच्या कॅप्टननं त्याच्या स्टाईलनं उत्तर दिलं. पहिल्या दिवसाचा शेवटचा बॉल बुमराहनं असा काही टाकला की टीम इंडियाचे सर्व फॅन्स खुश झाले आहेत. तर ऑस्ट्रेलियन टीमचं टेन्शन वाढलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
सॅम कोन्स्टासनं मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केलं. तो पहिल्या इनिंगपासून त्याच्या मैदानावरील वर्तनानं चर्चेत आहे. मेलबर्न टेस्टमध्ये त्यानं विराट कोहलीशी गैरवर्तन केलं होतं. सिडनी टेस्टमध्येही तो शांत बसला नाही. ऑस्ट्रेलियन इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये बुमराह बॉलिंग करत होता.
बुमराहनं बॉल टाकण्यासाठी रन अप सुरु केला होता. त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या उस्मान ख्वाजनं त्याला तो तयार नसल्याचा इशारा केला. ख्वाजा आणि बुमराहमधील संभाषणामध्ये कोन्स्टासनं उडी मारली. त्यावेळी मैदानातील अंपायरला मध्यस्थी करावी लागली.
( नक्की वाचा : IND vs AUS : 'तूझं काम कर', यशस्वी जैस्वालनं Sam Konstas ला फटकारले, स्मिथलाही सोडलं नाही, Video )
बुमराहनं दिली शिक्षा
सॅम कोन्स्टासच्या या चुकीची शिक्षा बुमराहनं ऑस्ट्रेलियन टीमला दिली. त्यानं त्याच ओव्हरमधील दिवसाच्या शेवटच्या बॉलवर उस्मान ख्वाजाला आऊट केलं. बुमराहनं टाकलेला अप्रतिम बॉल अनुभवी ख्वाजाला समजलाच नाही. तो सेकंड स्लिपमधील केएल राहुलकडं कॅच देऊन आऊट झाला.
ABSOLUTE CINEMA IN SYDNEY. 🍿
— 𝓟𝓻𝓲𝓷𝓬𝓮 🥂 (@whyy__prince) January 3, 2025
- Sam Konstas involved in an argument with Bumrah.
- Bumrah removed Khawaja on the last ball.
- Team India totally fired up.
- Bumrah gives an ice cold stare to Konstas after the wicket. 🥶#INDvsAUST #AUSvIND pic.twitter.com/sQawQgOYAZ
बुमराहनं त्यानंतर दमदार सेलिब्रेशन करत माझ्याशी पंगा घेऊ नकोस असं सॅम कोन्स्टासकडं बघत सांगितलं. बुमराहाच्या त्या विकेटनंतर संपूर्ण टीम इंडियानं एकत्र येत जल्लोष केला. उस्मान ख्वाजा फक्त 2 रन काढून आऊट झाला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या 185 रन्सना उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं 1 आऊट 9 रन केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world