जाहिरात

IND vs ENG सिनेमा पाहात होतो त्यावेळी... श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर रोहित आणि गंभीरवर होतीय टीका!

India vs England 1st ODI Shreyas Iyer : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या वन-डेनंतर श्रेयस अय्यरनं केलेल्या खुलाशानंतर वादळ उठलं आहे.

IND vs ENG सिनेमा पाहात होतो त्यावेळी... श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर रोहित आणि गंभीरवर होतीय टीका!
मुंबई:

India vs England 1st ODI Shreyas Iyer : भारतानं इंग्लंड विरुद्ध  झालेली पहिली वन-डे मॅच 4 विकेट्सनं आरामात जिंकली. कॅप्टन रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी अनुक्रमे 87 आणि 59 रन करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. मुंबईकर श्रेयसनं 59 रन्स करण्यासाठी फक्त 36 बॉल घेतले. या खेळीत त्यानं 9 फोर आणि 2 सिक्स लगावले. 163.88 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केलेल्या श्रेयसनं मॅचनंतर केलेल्या खुलाशानंतर वादळ उठलंय. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर आता टीका होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला श्रेयस?

नागपूर वन-डे साठी निवडण्यात आलेल्या मूळ प्लेईंग 11 मध्ये श्रेयसचा समावेश नव्हता. या सामन्यात यशस्वी जैस्वाल खेळणार हे निश्चित होते. पण, गेल्या काही वर्षांपासून वन-डे टीममध्ये नियमितपणे नंबर 4 वर खेळणाऱ्या श्रेयसला विराट कोहली अनफिट झाल्यानंच टीममध्ये जागा मिळाली.

श्रेयसनं मॅचनंतर याबाबत खुलासा केला. त्यानं सांगितलं की, 'ही एक मजेदार गोष्ट आहे. मी काल रात्री एक सिनेमा पाहात होतो. रात्री उशीरा मी झोपू शकतो असा मी विचार केला. पण त्याचवेळी मला कॅप्टन रोहितचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की तू उद्या खेळू शकतोस. कारण, विराटचा पाय सुजला आहे. त्याच्या फोनननंतर मी लगेच रुमकडे पळालो आणि सरळ झोपी गेलो.'

( नक्की वाचा : IND vs ENG : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली कमाल, आजवर कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते केलं! )
 

श्रेयसच्या खुलाशानंतर खळबळ

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाशा चोप्रानं श्रेयसच्या या खुलाशानंतर आश्चर्य व्यक्त केलं आहे. श्रेयसनं वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये चार नंबरला खेळून सर्वात पहिल्यांदा 500 रन केले होते. तुम्ही त्याला बेंचवर कसं ठेवू शकता? तो खेळणार नसला तर कोहली कुठं बॅटिंग करणार होता? असा प्रश्न आकाश चोप्रानं विचारला आहे. 

आणखी एक माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलनंही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. शेवटच्या 10 वन-डेमध्ये अय्यर आणि शुबमन गिलची सरासरी 60 आहे. त्यामुळे तो 100 टक्के खेळणार असं आम्हाला सर्वांना वाटत होतं. त्यामुळे पुढील सामन्यात रोहित शर्मा आणि गौतम गंभीर कोणत्या कॉम्बिनेशनसह खेळणार हे पाहावं लागेल, असं पार्थिवनं 'स्टार स्पोर्ट्स' वर बोलताना सांगितलं. 

भारतीय फॅन्सनी देखील या प्रकरणात टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका केली आहे. रोहित शर्मा आणि गौतम गंभीरला लाज वाटली पाहिजे अशी भावना करणारे ट्विट भारतीय फॅन्सनी केले आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी वन-डे रविवारी (9 मार्च) कटकमध्ये होत आहे. या सामन्यासाठी विराट कोहली फिट झाला तर टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह खेळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: