India vs England T20 Series : फास्ट बॉलर मोहम्मद शमीचं (Mohammed Shami) भारतीय क्रिकेट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. भारतामध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कप गाजवणारा शमी नोव्हेंबर 2023 पासून दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होता. तो 19 नोव्हेंबर 2023 साली अहमदाबादमध्ये झालेली वर्ल्ड कप फायनल खेळला होता. त्यानंतर आता 14 महिन्यांनी त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची T20 सीरिज होत आहे.
वन-डे वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीनं सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे अवघ्या 7 मॅचमध्ये त्यानं ही कामगिरी केली होती. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये त्याची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.
निवड समितीच्या पाच सदस्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत शमीचा टीम इंडियात समावेश करण्याचा निर्णय झाला. सूर्यकुमार यादव या टीमचा कॅप्टन असून ऑल राऊंडर अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोहम्मद शमीनं गुडघादुखीनंतर भारतीय टीममध्ये येण्यापूर्वी बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश रणजी मॅचमध्ये 43 ओव्हर्स बॉलिंग केली होती. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतही खेळला होता. त्यामध्ये त्यानं 9 विकेट्स घेतल्या. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शमीनं 3 मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला थेट चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या टीममध्ये खेळवण्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध उतरवण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. काही भारतीय खेळाडूंच्या फिटनेसचा अंदाज घेण्यासाठीच बीसीसीआयनं नियोजित मुदतीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचं नाव पहिलं आहे.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025: 2 कारणांमुळे BCCI लांबणीवर टाकली टीमची घोषणा, प्रकरण 'गंभीर' )
ऋषभ पंतला धक्का
इंग्लंड विरुद्धच्या T20 सीरिजमध्ये ध्रुव जुरेलचा दुसरा विकेट किपर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आलाय. दक्षिण आफ्रिका विरुद्धची T20 सीरिज गाजवलेला संजू सॅमसन पहिल्या पसंतीचा विकेट किपर असेल. तर T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेल्या ऋषभ पंतचा या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
A look at the Suryakumar Yadav-led squad for the T20I series against England 🙌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nrEs1uWRos
— BCCI (@BCCI) January 11, 2025
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सेंच्युरी झळकावणारा ऑल राऊंडर नितीश कुमार रेड्डीचा T20 टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेट किपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, नितिशकुमार रेड्डी, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (विकेट किपर )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world