जाहिरात

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धची सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाचा मुंबई टेस्टसाठी धाडसी निर्णय

India vs New Zealand, Mumbai Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील आव्हान भक्कम ठेवण्यासाठी भारताला मुंबईत जिंकणं आवश्यक आहे.

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धची सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाचा मुंबई टेस्टसाठी धाडसी निर्णय
Team India : भारतीय क्रिकेट टीमला मुंबई टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. (Photo - BCCI)
मुंबई:

India vs New Zealand, Mumbai Test : टीम इंडियाची मायदेशातील टेस्ट सीरिजमध्ये अपराजित राहण्याची 12 वर्षांची परंपरा तुटली आहे.  भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडनं 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची टेस्ट शुक्रवार (1 नोव्हेंबर) पासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. भारतीय टीमनं सीरज गमावलीय. पण, व्हाईटवॉशची नामुश्की टाळण्यासाठी तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील आव्हान भक्कम ठेवण्यासाठी भारताला मुंबईत जिंकणं आवश्यक आहे.

टीम मॅनेटमेंटनं मुंबई टेस्टच्या पिचबाबत एक धाडसी निर्णय घेतला असल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलं आहे. मुंबईत होणाऱ्या टेस्टसाठी सपोर्टिंग पिच तयार करण्यात येणार असल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. भारतामधील टेस्ट सीरिजमध्ये सामान्यत:  स्पिन बॉलिंगला अनुकूल पिच बनवले जाते. पुणे टेस्टमध्ये पहिल्या दिवसापासूनच खेळपट्टी स्पिनर्सला मदत करत होती.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबई टेस्टसाठी 'सपोर्टिंग ट्रॅक' तयार करण्यात येणार आहे. सध्या या पिचवर थोडे गवत असून पहिल्या दिवशी हे पिच बॅटिंगसाठी अनुकूल असेल. दुसऱ्या दिवसापासून हे पिच स्पिन बॉलर्सला मदत करेल, अशी माहिती या वृत्तामध्ये सुत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली आहे. 

यापूर्वी काय झाले होते?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये वानखेडे स्टेडियमवर टेस्ट मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये यजमान टीमनं न्यूझीलंडचा 372 रन्सनी दणदणीत पराभव केला होता. स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर न्यूझीलंडची इनिंग 62 आणि 167 रनवरच संपुष्टात आली होती. 

Gary Kirsten यांनी पाकिस्तान टीमचं प्रशिक्षकपद का सोडलं? खरं कारण उघड

( नक्की वाचा : Gary Kirsten यांनी पाकिस्तान टीमचं प्रशिक्षकपद का सोडलं? खरं कारण उघड )

भारतीय टीमनं दुसरिकडं पहिल्या इनिंगमध्ये 325 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 276 रन केले. आर. अश्विननं दोन्ही इनिंगमध्ये मिळून 8 विकेट्ेस घेतल्या. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं पहिल्या इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्येही 4 विकेट्स घेतल्या होत्या. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com