जाहिरात
This Article is From Jan 26, 2025

Tilak Varma : तिलक वर्माची तुफानी खेळी; विराटला मागे टाकत मोठा विक्रम केला आपल्या नावे

Tilak Varma Record : तिलक वर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन सामन्यांत न आऊट 300 हून अधिक धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. तिलकने कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. 

Tilak Varma : तिलक वर्माची तुफानी खेळी; विराटला मागे टाकत मोठा विक्रम केला आपल्या नावे

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात तिलक वर्माने 72 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्माचे हे भारतातील पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिलकने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. कालच्या सामन्यात तिलक वर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिलक वर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.  सलग चार T20I डावात सर्वाधिक धावा करणारा तिलक वर्मा हा भारतीय फलंदाज ठरला. आतापर्यंत तिलकने 4 डावात आउट न होता एकूण 318 धावा केल्या आहेत. तिलकच्या आधी विराट कोहली (258), संजू सॅमसन (257), रोहित शर्मा (253) आणि शिखर धवन (252) यांनी सलग चार डावात न आऊट धावा केल्या होत्या. 

(नक्की वाचा- रोहित शर्माचे पुनरागमन फेल, जम्मू काश्मीरकडून गतविजेत्या मुंबईचा धक्कादायक पराभव)

मागील तीन T20I डावांमध्ये तिलकने 19*, 120* आणि 107* धावा कुटल्या होत्या. तर काल चेपॉकमध्ये 55 चेंडूत नाबाद 72 धावा करून त्याने आणखी एक अप्रतिम खेळी खेळली. त्याच्या या खेळीने भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली आणि आतापर्यंत T20I मध्ये आउट न होता 318 धावा करण्यात यश मिळवले आहे. 

( नक्की वाचा :  रोहित शर्माला काय झालंय? जम्मू काश्मीरनं काढली उरली-सुरली लाज )

भारताची मालिकेत 2-0 ने आघाडी

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाने 20 षटकात 9 विकेट गमावत 165 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 45 धावांची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

भारताकडून तिलकने नाबाद 72 धावांची खेळी केली. तिलकव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरने 19 चेंडूत 26 धावांची खेळी केली. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिलकला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com