IPL 2024 : पहिल्याच मॅचमध्ये विराटनं 'हे' काय केलं? फॅन्स संतापले...

आयपीएल 2024 मधील पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीच्या कृतीवर फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
विराट कोहलीच्या कृतीवर फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय.
मुंबई:

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या मॅचनं आयपीएल २०२४ ला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आरसीबीनं दिलेलं 174 रन्सचं आव्हान सीएसकेनं 6 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. सीएसकेकडून पहिलीच मॅच खेळणारा मुस्तफिजूर रहमान या विजयाचा शिल्पकार ठरला. बांगलादेशच्या या बॉलरनं 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सीएसकेकडून सलामीवीर राचिन रविंद्रनं सर्वाधिक 37 रन्स केले.

विराटनं हे काय केलं....

विराट कोहली नेहमीच आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. आरसीबीच्या फिल्डिंगच्या दरम्यान राचिन रविंद्र आऊट झाल्यानंतर त्यानं त्याच्या खास स्टाईलनं सेलिब्रेशन केलं.

कोहलीची ती रिएक्शन पाहून क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय. (Virat Kohli Gives Angry Send-Off To Rachin Ravindra viral on internet)

न्यूझीलंडचा 22 वर्षांचा ऑल राऊंडर असलेल्या राचिन रविंद्रची ही पहिलीच आयपीएल मॅच होती. यावेळी जगातील महान खेळाडू विराट कोहलीनं रविंद्र आऊट झाल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन अनेकांना आवडलेलं नाही. कर्ण शर्माच्या बॉलिंगवर रजत पाटीदारनं रविंद्रचा कॅच पकडला. त्यावेळी कोहलीनं आक्रमक पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. कोहलीचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

Advertisement
Advertisement

बॅटिंगमध्येही निराशा

सीएसके विरुद्ध आरसीबी या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीवर सर्वांचं लक्ष होतं. आयपीएलपूपर्वी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमधून कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतरलेल्या विराटचा खेळ पाहण्याची संपूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता होती.  

विराटला बॅटिंगमध्ये फारशी कमाल करता आली नाही. तो 20 बॉलमध्ये 21 रन्स करुन आऊट झाला. मुस्तफिजूर रहमानच्या बॉलिंगवर विराटनं मारलेला फटका अजिंक्य रहाणेनं बाऊंड्री लाईनजवळ अडवला.  विराटचा कॅच घेण्याच्या नादात आपण बाऊंड्री लाईन पार करत आहोत हे अजिंक्यच्या लक्षात आलं. त्यानं त्यावेळी प्रसंगावधान दाखवत जवळच उभ्या असलेल्या राचिन रविंद्रकडं बॉल फेकला. रविंद्रनं कोणतीही चूक न करता कॅच घेत विराटची खेळी संपुष्टात आणली.
 

Advertisement
Topics mentioned in this article