चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या मॅचनं आयपीएल २०२४ ला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आरसीबीनं दिलेलं 174 रन्सचं आव्हान सीएसकेनं 6 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. सीएसकेकडून पहिलीच मॅच खेळणारा मुस्तफिजूर रहमान या विजयाचा शिल्पकार ठरला. बांगलादेशच्या या बॉलरनं 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सीएसकेकडून सलामीवीर राचिन रविंद्रनं सर्वाधिक 37 रन्स केले.
विराटनं हे काय केलं....
कोहलीची ती रिएक्शन पाहून क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय. (Virat Kohli Gives Angry Send-Off To Rachin Ravindra viral on internet)
A 22 year old youngster Rachin Ravindra is playing his first IPL match.
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) March 22, 2024
And this is the reaction of Virat Kohli after his wicket.
Not cool bro!! #CSKvsRCB pic.twitter.com/RBC5YUNSmF
A 22 year old youngster Rachin Ravindra is playing his first IPL match.
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) March 22, 2024
And this is the reaction of Virat Kohli after his wicket.
Not cool bro!! #CSKvsRCB pic.twitter.com/RBC5YUNSmF
न्यूझीलंडचा 22 वर्षांचा ऑल राऊंडर असलेल्या राचिन रविंद्रची ही पहिलीच आयपीएल मॅच होती. यावेळी जगातील महान खेळाडू विराट कोहलीनं रविंद्र आऊट झाल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन अनेकांना आवडलेलं नाही. कर्ण शर्माच्या बॉलिंगवर रजत पाटीदारनं रविंद्रचा कॅच पकडला. त्यावेळी कोहलीनं आक्रमक पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. कोहलीचं हे सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
Shame on you #Viratkohli
— 𝕏`ℝ𝕆ℍ𝕀𝕋 (@cap_x_mahesh) March 22, 2024
Virat Kohli abusing and doing sending off gesture to a 22yrs old youngster Rachin ravindra.
People call him king but his attitude and ego don't deserve this name! #CSKvRCB #WhistlePodu #IPLonJioCinema #CSK #TATAIPL2024
pic.twitter.com/iZPPQQl5cW
Kohli giving send off to 22 yr old Rachin !!
— SAM (@Vitamin_is_back) March 22, 2024
This guy is so shameless #CSKvRCB https://t.co/jblIBkY58S
बॅटिंगमध्येही निराशा
सीएसके विरुद्ध आरसीबी या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीवर सर्वांचं लक्ष होतं. आयपीएलपूपर्वी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमधून कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतरलेल्या विराटचा खेळ पाहण्याची संपूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता होती.
विराटला बॅटिंगमध्ये फारशी कमाल करता आली नाही. तो 20 बॉलमध्ये 21 रन्स करुन आऊट झाला. मुस्तफिजूर रहमानच्या बॉलिंगवर विराटनं मारलेला फटका अजिंक्य रहाणेनं बाऊंड्री लाईनजवळ अडवला. विराटचा कॅच घेण्याच्या नादात आपण बाऊंड्री लाईन पार करत आहोत हे अजिंक्यच्या लक्षात आलं. त्यानं त्यावेळी प्रसंगावधान दाखवत जवळच उभ्या असलेल्या राचिन रविंद्रकडं बॉल फेकला. रविंद्रनं कोणतीही चूक न करता कॅच घेत विराटची खेळी संपुष्टात आणली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world