IPL 2024, MS Dhoni: आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक वरचा आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता साडेतीन वर्ष झाली आहेत. या निवृत्तीनंतर तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. त्यामुळे त्याच्या फॅन्सना आयपीएलची मोठी उत्सुकता असते. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (सीएसके) मागील आयपीएल सिझनमध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तो निवृत्त होणार अशी चर्चा होती. धोनीनं या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत हा सिझन खेळणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कोणता रेकॉर्ड करणार?
एबी डीव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही हा रेकॉर्ड करणे जमलेलं नाही.
धोनी आयपीएलमध्ये एकाच टिमकडून खेळताना 5000 रन्स करण्यापासून 43 रन्स दूर आहे. आरसीबीविरुद्ध त्यानं हे रन्स केले तर तो हा रेकॉर्ड करणारा सीएसकेचा दुसरा आणि एकूण चौथा क्रिकेटपटू बनेल. धोनीनं आत्तापर्यंत सीएसकेकडून 4957 रन्स केले आहेत. सीएसकेकडून यापूर्वी सुरेश रैनानं 5 हजारपेक्षा जास्त रन्स केलेत.
आयपीएलमध्ये एका फ्रँचायझीकडून सर्वात जास्त रन्स करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटनं आरसीबीकडून आत्तापर्यंत 7263 रन्स केले आहेत. तर सुरेश रैना 5529 रन्ससह या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एकाच आयपीएल टीमकडून सर्वाधिक रन्स करणारे फलंदाज
नाव | टीम | रन्स |
विराट कोहली | आरसीबी | 7263 |
सुरेश रैना | सीएसके | 5529 |
रोहित शर्मा | मुंबई इंडियन्स | 5314 |
महेंद्रसिंह धोनी | सीएसके | 4957 |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world