
IPL 2025: आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीगच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 10 संघ, 13 शहरे आणि 74 सामन्यांचा थरार या आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे. या सीझनसाठी काही संघांनी नवे कर्णधार घोषित केले आहेत. यामध्ये आता शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआरचाही समावेश असून कोलकाता संघाने मराठमोठ्या खेळाडूकडे आपल्या संघाची कमान सोपवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 पूर्वी श्रेयस अय्यरला सोडण्याचा निर्णय घेतला होता, जो गेल्या हंगामापर्यंत त्यांचा कर्णधार होता आणि संघाला चॅम्पियन देखील बनवला होता. अशा परिस्थितीत, आयपीएल 2025 च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. केकेआरने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, वेंकटेश अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे.
अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा या संघाचा भाग झाला आहे. यापूर्वी, तो 2022 मध्येही या केकेआरचा भाग होता. यावेळी मेगा लिलावात,कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेवर1.5 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे केकेआरने त्याला बेस प्राइसवर खरेदी केले होते. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेसाठी ही एक मोठी संधी असणार आहे.
Rohit Sharma: एका रोहितसाठी दुसरा रोहित सरसावला, मित्रपक्ष असूनही काँग्रेसवर तुटून पडला
या घोषणेदरम्यान केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, 'आम्हाला आनंद आहे की आम्ही अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूला कर्णधार म्हणून नियुक्त करत आहोत, जो त्याच्या नेतृत्व क्षमतेने आणि अनुभवाने संघाला बळकटी देईल.' त्याच वेळी, व्यंकटेश अय्यर देखील केकेआरसाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत. आम्हाला खात्री आहे की ते एकत्रितपणे आमच्या संघाला योग्य दिशेने घेऊन जातील आणि आम्ही आमचे जेतेपद राखण्यात यशस्वी होऊ.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world