जाहिरात

IPL 2025 मध्ये कोणाला मिळेल ऑरेंज आणि पर्पल कॅप ? वासिम जाफरने वर्तवली भविष्यवाणी

Wasim Jaffer Prediction: वासिम जाफर याने IPL 2025 मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी दोन भारतीय खेळाडू असतील असे भाकीत वर्तवले आहे.

IPL 2025 मध्ये कोणाला मिळेल ऑरेंज आणि पर्पल कॅप ? वासिम जाफरने वर्तवली भविष्यवाणी
आयपीएलमधील सगळ्या संघांचे कर्णधार IPL ट्रॉफीसह
मुंबई:

Indian Premier League Wasim Jaffer Prediction: आयपीएल 2025 चा शनिवारी शुभारंभ होणार आहे. यंदाचा आयपीएलचा 18 वा सीझन (IPL 18th Season) आहे. आयपीएलला (Indian Premier League 2025) सुरुवात होण्यापूर्वी माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याने एक मोठे भाकित वर्तवले आहे. त्याच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा 

47 वर्षांच्या जाफरने दोन क्रिकेटपटूंची नावे सांगितली आहेत जे IPL 2025 मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी असतील. जाफरच्या मते Gujarat Titans आणि Punjab Kings संघासाठी खेळणारे हे दोन क्रिकेटपटू यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करतील. जाफरने गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शन आणि पंजाब किंग्जचा अर्शदीप सिंग हे या सामन्यात उत्तम कामगिरी करतील असे भाकीत वर्तवले आहे.

नक्की वाचा : IPL 2025: सुपर ओव्हरचा थरार बंद! यंदाच्या IPLमध्ये 6 नवे नियम; 'असा' ठरणार विजेता

आयपीएलच्या 18 व्या सीझनसाठी गुजरातच्या टीमने साई सुदर्शनला 8.50 कोटी रुपये मोजत रिटेन केले होते. तर पंजाब किंग्जने अर्शदीप सिंगसाठी 18 कोटी रुपये मोजत राईट टू कार्डचा वापर करत पुन्हा आपल्यासोबत घेतले आहे.

IPL 2024 मध्ये दोघांची उत्तम कामगिरी गेल्या आयपीएलमध्ये साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंग यांनी भन्नाट कामगिरी केली होती. गुजरात टायटन्ससाठी साई सुदर्शनने 12 डावात 47.91 च्या सरासरीने 527 धावा कुटल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट हा 141.29 इतका होता. गेल्या सीझनमध्ये साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा सहावा क्रमांक होता.

नक्की वाचा : IPL 2025: IPLच्या तिकीटांची विक्री सुरु! काय आहेत दर अन् कसे कराल बुकिंग? लगेचा वाचा..

अर्शदीप सिंगबाबत बोलायचे झाल्यास त्याने पंजाबकडून खेळताना एकूण 14 सामने खेळले होते. 14 डावांमध्ये त्याने 26.58 च्या सरासरीने 19 विकेट मिळवल्या होत्या. असं असलं तरी त्याने धावाही बऱ्याच दिल्या होत्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: