IPL 2025 Mega Auction Live Updates : ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) दिल्ली कॅपिटल्सनं खरेदी केलं आहे. आयपीएल 2024 साली झालेल्या ऑक्शनमध्ये स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 24 कोटी 75 लाख रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केलं होतं. यंदा त्याचा भाव घसरला असून त्याला 11 कोटी 75 लाख किंमत मिळाली आहे.
स्टार्क आहे बेस्ट
मिचेल स्टार्क आत्तापर्यंत आयपीएलचे फक्त तीन सिझन खेळला आहे. 2014 आणि 2015 नंतर तो थेट आयपीएल 2024 मध्ये खेळला. आयपीएलपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं एकेकाळी नाव होतं. पण, त्यानंतरही त्याचं मोल कमी होत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टेस्ट, वन-डे आणि T20 इंटरनॅशनल या सर्व प्रकारात तो ऑस्ट्रेलिया प्रमुख बॉलर आहे. ऑस्ट्रेलियानं जिंकलेला वन-डे वर्ल्ड कप (2015, 2023) टी20 वर्ल्ड कप (2020) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2023) टीममधील तो महत्त्वाचा खेळाडू होता.
स्टार्कनं आत्तापर्यंत 89 टेस्टनमध्ये 358, 127 वन-डेमध्ये 244 तर 65 T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तर तीन आयपीएल सिझनमिळून तो 41 मॅच खेळला असून त्यामध्ये त्यानं 8.21 च्या इकोनॉमी रेटनं 51 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2024 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं 24 कोटी 75 लाख रुपये देऊन खरेदी केलं होतं.
( नक्की वाचा : 'एलिसाला कुठं लपवलं होतंस?' बायकोबद्दल प्रश्न विचारताच Mitchell Starc म्हणाला.... )
आयपीएल 2024 मधील लीग मॅचेसमध्ये त्याची कामगिरी साधारण होती. पण, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये स्टार्कनं त्या सिझनमधील सर्वोत्तम खेळ केला. स्टार्कनं 3 ओव्हर्समध्ये फक्त 14 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्यानं हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या टॉप ऑर्डरमधील खेळाडूंची विकेट घेतली होती. या कामगिरीसाठी त्याला फायनलचा 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
मोठ्या स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्यात सामन्यात सरस खेळ करण्यासाठी मिचेल स्टार्क ओळखला जातो. स्टार्कच्या या क्षमतेचा फायदा त्याच्या आयपीएल टीमला होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world