जाहिरात

MI Vs CSK: चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची दाणादाण! CSKला 156 धावांचे टार्गेट

IPL 2025 Chennai Super Kings Vs Mumbai Indians: मुंबईच्या धावफलकावर एकही रन्स नसताना रोहित शर्माला शून्यावर आऊट करत पहिल्याच षटकात खलील अहमदने पहिला धक्का दिला. त्यानंतर मुंबईच्या डावाला उतरती कळा लागली.

MI Vs CSK: चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची दाणादाण! CSKला 156 धावांचे टार्गेट

IPL 2025 MI Vs CSK: आयपीएलच्या स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज हायहोल्टेज लढत होत आहे. चेन्नईमधील चेपॉक मैदानावर सुरु असलेल्या या लढतीत चेन्नईने भेदक मारा करत मुंबई इंडियन्सला 155 धावांवर रोखले. आता हा सामना जिंकण्यासाठी चेन्नईपुढे 156 धावांचे लक्ष असेल. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 29 धावांची खेळी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनने घेतलेला हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मुंबईच्या धावफलकावर एकही रन्स नसताना रोहित शर्माला शून्यावर आऊट करत पहिल्याच षटकात खलील अहमदने पहिला धक्का दिला. त्यानंतर मुंबईच्या डावाला उतरती कळा लागली.

रोहित शर्मानंतर खलील अहमदने मुंबईच्या सलामी जोडीला रायन रिकेल्टलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर आर अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विल जॅक्सला आऊट करत मुंबईला तिसरा धक्का दिला. मुंबईकडून तिलक वर्माने 25 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

या खेळीत त्याने  2 चौकार आणि 2 षटकार लगावले. याव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शेवटच्या षटकांमध्ये दिपक चहरने 18 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्यासोबत खलील अहमदने 2,  अश्विनने 1 बळी घेतला. 

नक्की वाचा - European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार

चेन्नईची टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नाथन एलिस आणि खलील अहमद

मुंबई इंडियन्सची टीम:  रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिंज, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू

IPL 2025: चेन्नईच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! यंदाच्या आयपीएलनंतर धोनीची निवृत्ती? माहीने सांगून टाकलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: