जाहिरात

IPL 2025 : हार्दिक-तिलकची फटकेबाजी व्यर्थ, RCB नं पाडला मुंबईचा किल्ला, दमदार विजयासह केला रेकॉर्ड

IPL 2025, MI vs RCB : आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका सुरुच आहे.

IPL 2025 : हार्दिक-तिलकची फटकेबाजी व्यर्थ, RCB नं पाडला मुंबईचा किल्ला, दमदार विजयासह केला रेकॉर्ड
मुंबई:

IPL 2025, MI vs RCB : हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या फटकेबाजीनंतर मुंबई इंडियन्सचा आरसीबी विरुद्ध 12 रन्सनं पराभव झाला. हार्दिक-तिलक जोडीनं करत मुंबई इंडियन्सननं मुंबईच्या फॅन्सच्या आशा जागवल्या होत्या. आरसीबीनं दिलेलं 222 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अवस्था 4 आऊट 99 अशी झाली होती. त्यानंतर हार्दिक आणि तिलक या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 34 बॉलमध्ये 89 रन केले. 

हार्दिक पांड्यानं सुरुवात आक्रमक करत टीम हार मानणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं मागील मॅचमध्ये संथ खेळामुळे रिटायर आऊट करण्यात आलेल्या तिलक वर्मानंही फटकेबाजी केली. तिलकनं 26 बॉल्समध्ये 4 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी झळकावली. तिलक 28 बॉलमध्ये 56 रन काढले. तर हार्दिक पांड्या 15 बॉलमध्ये 42 रन काढून आऊट झाला. 

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका सुरुच आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं (Royal  Challengers Bengaluru) नं यजमान टीमचा  पराभव केला. आरसीबीनं दिलेलं 222 रन्सचं आव्हान मुंबई इंडियन्सला पेलवलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान टीमची आरसीबी विरुद्धची कामगिरी नेहमीच सरस ठरल्याचा इतिहास होता. या मैदानात यापूर्वी 2015 साली मुंबई इंडियन्सनं आरसीबीविरुद्ध पराभव सहन केला होता. त्यानंतर दहा वर्षांनी आरसीबीनं वानखेडेवर विजय मिळवला आहे.

आरसीबीचा मोठा रेकॉर्ड

टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या आरसीबीची सुुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट फक्त 4 रन काढून आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी आक्रमक बॅटिंग करत इतिहास रचला. 

विराट आणि देवदत्तनं पहिल्या सहा ओव्हर्सच्या पॉवर प्लेचा जोरदार फायदा उचलला. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 73 रन काढले. आरसीबीचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा पॉवर प्लेमधील हा सर्वोत्तम स्कोअर आहे. यापूर्वी आरसीबीनं 2011 साली चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 68 रन केले होते.

( नक्की वाचा : विराट कोहलीनं 5 सेकंदामध्ये दिलं सर्वात मोठं अपडेट, फॅन्समध्ये जोरदार चर्चा! Video )
 

विराट कोहलीनं 42 बॉलमध्ये 67 रन केले. आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारनं 32 बॉलमध्ये 64 रन काढले. या दोघांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर आरसीबीनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 221 रन काढले.

मुंबईची खराब सुरुवात

222 रनचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. या आयपीएल सिझनमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी धावसंख्या रचण्यात अपयशी ठरला. रोहितनं 9 बॉलमध्ये 17 रन काढले. विल जॅक्स (22) आणि सूर्यकुमार यादव (28) रनवर आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सयं संकट आणखी वाढलं.

मुंबई इंडियन्सचा या सिझनमधील पाचव्या सामन्यात हा चौथा पराभव आहे. आता त्यांची पुढील लढत 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सला इथून पुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: