जाहिरात

IPL 2025: KKR vs RCB पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट; पावसाची शक्यता किती? 

IPL 2025 : आयपीएलमध्ये केकेआरने नेहमीच आरसीबीवर वर्चस्व गाजवले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 35 सामने खेळले गेले आहेत.

IPL 2025: KKR vs RCB पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट; पावसाची शक्यता किती? 

IPL 2025, RCB vs KKR : आयपीएल 2025 चा सीजन सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. सर्व खेळाडूंसह क्रिकेट फॅन्सही टी 20 क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सज्ज आहेत. सीझन-18 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळे पहिलाच सामना रद्द होऊ शकतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना 22 मार्च रोजी खेळवला जाईल. आता या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. वेदर डॉट कॉमच्या मते, सामन्याच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान पाऊस पडण्याची 10 टक्के शक्यता आहे. तर रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान 50 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातील.

(नक्की वाचा-  IPL 2025 : वर्ल्ड कप फायनल गाजवली; विराटचा मित्र आता IPL मध्ये करणार अंपायरिंग)

RCB आणि KKR आमने-सामने

आयपीएलमध्ये केकेआरने नेहमीच आरसीबीवर वर्चस्व गाजवले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 35 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 21 सामने आणि आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत.

(नक्की वाचा- IPL 2025 : कोलकाता विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यात बदल होणार, काय आहे कारण?)

यंदा पाच संघांना नवीन कर्णधार 

आयपीएलमध्ये यंदा पाच संघ नवीन कर्णधारांसह खेळणार आहेत. ज्यामध्ये आरसीबी आणि केकेआरच्या संघांचा देखील समावेश आहे. आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदारकडे आहे, तर केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: