
Who is Tanmay Srivastava : भारतीय क्रिकेटमध्ये अशी अनेक नावे आहेत, ज्यांची सुरुवात दणक्यात झाली. मात्र त्यानंतर ते खेळाडू कुठे दिसलेच नाही. अनेक खेळाडू वेगवेगळ्या भूमिकेत क्रिकेटशी जोडून राहिले. विराटसोबत खेळलेला असाच एक खेळाडू आता क्रिकेटच्या मैदानाने अंपायरिंग करताना दिसणार आहे. विराट कोहलीसोबत अंडर 19 संघात असलेला तन्मय श्रीवास्तव टी 20 लीगमधून अंपायर म्हणून पदार्पण करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार , तन्मयला वयाच्या 35 व्या वर्षी आयपीएलमध्ये अंपायरिंग करण्याची संधी मिळाली आहे. 2008 च्या आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात तन्मय भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण त्याची कारकीर्द कोहलीच्या कारकिर्दीसारखी बहरली नाही. 2008 च्या अंडर 19 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. त्यानंतर तन्मयने पंजाब किंग्जसोबत करार केला. मात्र नंतर त्याला क्रिकेटमध्ये काही खास करता आले नाही.
(नक्की वाचा- IPL 2025 : कोलकाता विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यात बदल होणार, काय आहे कारण?)
तन्मय वयाच्या 35 व्या वर्षी तो IPL मध्ये खेळणारा आणि अंपायरिंग करणारा पहिला खेळाडू बनणार आहे. तन्मयने 2008 ते 2009 दरम्यान पंजाबकडून 7 आयपीएल सामने खेळले. यानंतर तो कोची टस्कर्स केरळ आणि डेक्कन चार्जर्सचाही भाग होता. मात्र त्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
A true player never leaves the field—just changes the game.
— UPCA (@UPCACricket) March 17, 2025
Wishing Tanmay Srivastava the best as he dons a new hat with the same passion!#UPCA #IPL #UP #PrideOfUP pic.twitter.com/wrRoW31OG2
काय म्हणाला तन्मय?
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तन्मयने म्हटलं की,"मी जेवढा चांगला खेळाडू होता आलं तेवढा मी झालो. मी आयपीएल खेळण्याच्या जवळपासही नव्हतो. मला खेळाडू म्हणून दीर्घ कारकीर्द करायची आहे की दुसऱ्या भूमिकेत यशस्वी व्हायचे आहे हे ठरवायचे होते. मी अजूनही विराटच्या संपर्कात आहे. पण मला स्वतःसाठी निर्णय घ्यावा लागला आणि व्यावहारिक निर्णय घ्यावा लागला."
(नक्की वाचा- Virat Kohli : T20I क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्यास विराट तयार, टीमसमोर ठेवली खास अट)
"मी शुक्ला सरांना सांगितले की मला खेळण्याव्यतिरिक्त क्रिकेटमध्ये काहीतरी करायचे आहे. मग आम्ही पर्याय काय असू शकतात यावर चर्चा केली. मी एनसीएमध्ये कोचिंगचा लेव्हल 2 कोर्स केला. मला माहित होते की मी सर्वोत्तम क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनू शकतो. मात्र मी अंपायरिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. अंपायरिंगसाठी अभ्यास करणे कठीण आहे. मी रात्री जागून काढल्या. क्रिकेटचे नियम, कायदे आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो", असं तन्मयने सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world