
IPL 2025, RR vs CSK : आयपीएल 2025 मध्ये मंगळवारी (20 मे 2025) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) या दोन तळाच्या टीममध्ये मॅच झाली. या मॅचमध्ये सीएसकेनं पहिल्यांदा बॅटिंग करत राजस्थानसमोर विजयासाठी 188 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थाननं हे आव्हान 6 विकेट्स राखून पूर्ण केलं.
राजस्थानकडून यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal ) आक्रमक सुरुवात केली. तो 19 बॉलमध्ये 36 रन्स काढून आऊट झाला. यशस्वी आऊट झाल्यानंतर वैभव सुर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यांची जोडी जमली.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :वडिलांनी जमीन विकली, बेरोजगार झाले, वैभव सूर्यवंशीला घडवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट! )
चेन्नई सुपर किंग्सचा हा तेराव्या सामन्यातील दहावा पराभव आहे. सीएसकेचे फक्त 6 पॉईंट्स असून ते शेवटच्या क्रमांकावर आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा या सिझनमधील हा शेवटचा सामना होता. त्यांनी चेन्नईवरील विजयासह याचा शेवट गोड केला. राजस्थानला यंदा 14 पैकी 4 सामनेच जिंकता आले.
14 वर्षांच्या वैभवनं त्याची हाफ सेंच्युरी 27 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केली. 14 वर्षांच्या वैभवनं त्याची हाफ सेंच्युरी 27 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केली. वैभवनं संजू सॅमसनबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 98 रन्सची पार्टनरशिप केली. संजूनं 41 रन केले. त्यापाठोपाठ वैभव देखील 57 रन काढून आऊट झाला. या दोघांनाही अनुभवी आर. अश्विननं (R. Ashwin) एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं.
CSK ची बॅटिंग कशी झाली?
त्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सनं पहिल्यांदा बॅटिंग करत निर्धारत 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 187 रन्स केले. सीएसकेकडून आयुष म्हात्रेनं (Ayush Mhatre) सर्वात जास्त 43 रन्स काढले. आयुषनं 20 बॉलमध्येच 8 फोर आणि 1 सिक्सच्या जोरावर ही खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसनं (Dewald Brevis) 25 बॉलमध्ये 42 रन काढले.
सीएसकेच्या टॉप ऑर्डरनं पुन्हा एकदा निराशा केली. डेव्हॉन कॉनवे (10), उर्विल पटेल (0) रनवर आऊट झाले. चौथ्या क्रमांकावर प्रमोशन मिळालेल्या आर. अश्विननं 13 रन काढले. रविंद्र जडेजा फक्त 1 रन काढून आऊट झाला.
( नक्की वाचा : IPL 2025 New Schedule : आयपीएलचं वेळापत्रक पुन्हा बदललं, RCB ला धक्का ! फायनलबाबतही मोठं अपडेट )
शिवम दुबेनं 39 आणि महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 16 रन करत सीएसकेला 7 आऊट 187 रन्स पर्यंत मजल मारुन दिली. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमचं या सिझनमधील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world