जाहिरात

RCB vs PBKS : पावसाच्या अडथळ्यानंतर पंजाबचा पंच! RCB वर मात करत पॉईंट टेबलमध्ये झेप

IPL 2025, Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru : या विजयामुळे पंजाब किंग्ज आयपीएल 2025 मध्ये 10 पॉईंट्स मिळवणारी दुसरी टीम झालीय.

RCB vs PBKS : पावसाच्या अडथळ्यानंतर पंजाबचा पंच! RCB वर मात करत पॉईंट टेबलमध्ये झेप
मुंबई:

IPL 2025, Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru : यपीएल 2025 मधील 34 वा सामना पावसामुळे 14 ओव्हर्सचाच खेळवला गेला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जनं यजनाम आरसीबीचा पाच विकेट्सनं पराभव केला. पंजाबचा यीा सिझनमधील 7 सामन्यातील हा पाचवा विजय आहे. या विजयामुळे पंजाब किंग्ज आयपीएल 2025 मध्ये 10 पॉईंट्स मिळवणारी दुसरी टीम झालीय. तसंच पंजाब किंग्जनं आता पॉईंट टेबलमध्येही दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर आरसीबीचा या सिझनमधील हा 7 तिसरा पराभव आहे. या पराभवानंतर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे.

वढेराचा दमदार खेळ 

आरसीबीनं विजयासाठी 14 ओव्हर्समध्ये 96 रन्सचं टार्गेट दिलं होतं. त्यावेळी पंजाबचे ओपनर्स प्रियांश आर्य (16) आणि प्रभसिमरन जीत सिंह (13) यांनी सुरुवात चांगली केली, पण ते लवकर आऊट झाले. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 7 रन काढून आऊट झाला. श्रेयस पाठोपाठ जोश इंग्लिस (14) रन काढून आऊट झाल्यानं पंजाबची टीम अडचणीत सापडली होती.

त्यावेळी डावखुऱ्या नेहाल वढेरानं 19 बॉलमध्ये नाबाद 33 रन्सची खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीमुळे पंजाबनं 12.1 ओव्हर्समध्येच 5 विकेट राखून हा सामना जिंकला. 

IPL 2025 : धोनीची डोकेदुखी संपणार! MI च्या जुन्या खेळाडूची CSK मध्ये एन्ट्री, सिक्सर्ससाठी आहे प्रसिद्ध

( नक्की वाचा : IPL 2025 : धोनीची डोकेदुखी संपणार! MI च्या जुन्या खेळाडूची CSK मध्ये एन्ट्री, सिक्सर्ससाठी आहे प्रसिद्ध )

RCB ची खराब सुरुवात

त्यापूर्वी पावसानंतर सामना सुरु झाला त्यावेळी पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या बॉलर्सनी श्रेयसचा हा निर्णय योग्य ठरवला.

अर्शदीप सिंगनं फिल सॉल्ट (4) आणि विराट कोहलीला (1) झटपट आऊट केलं. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (4) आणि जितेश शर्मा (2) देखील झटपट आऊट झाले. त्यामुळे आरसीबीची अवस्था 4 आऊट  आऊट 32 अशी झाली होती. त्यानंतर कृणाल पांड्या देखील 1 रनवर आऊट झाल्यानं ही अवस्था आणखी बिकट झाली.

आरसीबीची ही पडझड सुरु असताना कॅप्टन रजत पाटीदारनं एक बाजू लावून धरली. त्याला 23 रनवर युजवेंद्र चहलनं आऊट केलं. पाटीदार आऊट झाल्यानंतर सर्वबाद 49 हा आरसीबीचाच निचांक मोडला जाणार का? अशी भीती निर्माण झाली होती.

त्यावेळी टीम डेव्हिडनं (Tim David) झुंजार बॅटिंग करत ही नामुश्की टाळली. त्यानं भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवुड या प्रमुख बॉलर्सना जोडीनं किल्ला लढवला. डेव्हिडनं 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 50 रन्स केले. डेव्हिड आणि हेजलवुड जोडीनं दहाव्या विकेटसाठी नाबाद 32 रन्सची पार्टरनरशिप केली. हा आरसीबीसाठी रेकॉर्ड आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: