जाहिरात

PBKS vs RCB, Qualifier 1: विराट कोहलीचं महारेकॉर्डवर लक्ष, 3 फोर लगावताच रचणार नवा इतिहास

PBKS vs RCB, Qualifier 1: विराट कोहलीचं महारेकॉर्डवर लक्ष, 3 फोर लगावताच रचणार नवा इतिहास
मुंबई:

Virat Kohli, Most Fours in IPL History:  चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (PBKS vs RCB) यांच्यात आयपीएल 2025 चा क्वालिफायर-1 सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यातील विजेती टीम थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. विशेष म्हणजे, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन्ही संघांनी आयपीएलच्या इतिहासात अजूनपर्यंत एकही विजेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची दोन्ही संघांची धडपड असेल. मुल्लांपूर येथे होणाऱ्या या सामन्यात बंगळूरचा माजी कर्णधार आणि आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणखी एका महारेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोहलीच्या निशाण्यावर विराट विक्रम

विराट कोहली सध्या आयपीएल इतिहासात सर्वाधिक फोर मारणाऱ्या बॅटर्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला या यादीत अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी केवळ तीन फोरची गरज आहे. विराटने कोहलीने पंजाबविरुद्धच्या सामन्यात तीन फोर मारले, तर तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक फोर लगावणारा बॅटर बनेल. हा रेकॉर्ड सध्या शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने 222 मॅचमधील 221 इनिंगमध्ये 768 फोर लगावले आहेत. तर विराटच्या नावावर 265 मॅचमधील 257 मॅचमध्ये 766 फोर आहेत. डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 184 मॅचमध्ये 663 फोर लगावले आहेत. 

( नक्की वाचा : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं वाढवलं टेन्शन! MCA ची मनधरणीसाठी धावाधाव )
 

सिक्सर्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणार?

विराट कोहलीनं आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 291 सिक्स लगावले आहेत. त्यानं पंजाबविरुद्ध 9 सिक्स लगावले तर तो आयपीएलमध्ये 300 सिक्स मारणारा पहिला भारतीय बॅटर ठरेल. तसेच तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक सिक्सर्स मारण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येईल. या यादीमध्ये ख्रिस गेल 357 सिक्सर्सह पहिल्या क्रमांकावर आहे. 

( नक्की वाचा : RCB vs PBKS: पावासामुळे Qualifier 1 रद्द झाली तर 'ही' टीम करणार फायनलमध्ये प्रवेश, वाचा नियम)
 

 शोएब मलिक आणि पोलार्डला मागं टाकणार?

विराटने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये 89 रन्सची खेळी केली, तर तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. विराट सध्या 13488 रन्ससह या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. किरॉन पोलार्डच्या नावावर 695 मॅचमध्ये 13537 रन्स आहेत. तर शोएब मलिकनं 557 मॅचमध्ये 13571 रन्स काढले आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com