जाहिरात

IPL 2025 GT Retentions : शमी आणि मिलरची गुजरात टायटन्समधून सुट्टी, 'या' खेळाडूंना केलं रिटेन

Gujarat Titans Retention List For IPL 2025: आयपीएल 2022 मधील विजेत्या गुजरात टायटन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोहम्मद शमी आणि डेव्हिड मिलर या दोन बड्या खेळाडूंचा समावेश नाही.

IPL 2025 GT Retentions : शमी आणि मिलरची गुजरात टायटन्समधून सुट्टी, 'या' खेळाडूंना केलं रिटेन
मुंबई:

Gujarat Titans Retention List For IPL 2025: आयपीएलच्या आगामी सिझनपूर्वी सर्व टीमनं त्यांच्या दिग्गज खेळाडूंना रिटेन केले आहे. आयपीएल 2025 मेगा ऑक्शनसाठी खेळाडूंना रिटेन करण्याची मुदत आता संपली आहे. आयपीएल 2022 मधील विजेत्या गुजरात टायटन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोहम्मद शमी आणि डेव्हिड मिलर या दोन बड्या खेळाडूंचा समावेश नाही.

गुजरात टायटन्सनं कॅप्टन शुबमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन यांना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राहुल तेवतिया आणि शाहरुख खान या अनकॅप खेळाडूंनाही रिटेन करण्याचा निर्णय गुजरात टायटन्सनं घेतला आहे. या पाच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी त्यांनी 51 कोटी खर्च केले आहेत. आता आगामी मेगा ऑक्शनसाठी 69 कोटी रुपये बजेट शिल्लक आहे.

  • राशिद खान - 18 कोटी
  • शुबमन गिल - 16.50 कोटी
  • साई सुदर्शन - 8.50 कोटी
  • राहुल तेवतिया - 4 कोटी
  • शाहरुख खान  - 4 कोटी

गुजरातचा आश्चर्यकारक निर्णय

गुजरात टायटन्सनं आयपीएलमध्ये 2022 साली पदार्पण केलं.  त्या सिझनमधील ऑक्शनपूर्वी त्यांनी करारबद्ध केलेल्या राशिद खान आणि शुबमन गिल यांना यंदाही रिटेन केलं आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडं गेल्यानंतर शुबमन गिलनं आयपीएल 2024 मध्ये गुजरातची कॅप्टनसी केली होती.

IPL 2025 KKR Retentions : आयपीएल विजेत्या कॅप्टनलाच केकेआरनं दाखवला बाहेरचा रस्ता

( नक्की वाचा :  IPL 2025 KKR Retentions : आयपीएल विजेत्या कॅप्टनलाच केकेआरनं दाखवला बाहेरचा रस्ता )

तामिळनाडूच्या 22 वर्षांचा बॅटर साई सुदर्शनला डेव्हिल मिलर आणि मोहम्मद शमीच्या जागी रिटेन करण्याचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. पण, साई आगामी काळात टीमच्या टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो, असं गुजरातच्या मॅनेजमेंटचं मत आहे. त्यामुळे त्यांनी साईवर विश्वास दाखवला आहे. साईनं आयपीएल 2024 मध्ये जवळपास 48 ची सरासरी आणि 141 च्या स्ट्राईक रेटनं  527 रन केले होते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: