Rohit Sharma on India vs Bangaladesh Test Series: भारतीय क्रिकेट टीम मोठ्या ब्रेकनंतर गुरुवारी (19 सप्टेंबर) मैदानात उतरणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्टला गुरुवारी चेन्नईमध्ये सुरुवात होत आहे. बांगलादेशनं नुकतीच पाकिस्तानविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 अशी एकतर्फी जिंकली. या ऐतिहासिक विजयामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच फास्ट बॉलर नाहिद राणाच्या समावेशानं पाहुणी टीम आणखी भक्कम झाली. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं मात्र या गोष्टींना फारसं महत्त्व दिलेलं नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित शर्मा मॅचपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'प्रत्येक टीमची भारताला हरवण्याची इच्छा असते. तो त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय असतो. त्यांना मजा करु दे. मॅच कशी जिंकायची याचा विचार करणं हे आमचं काम आहे. प्रतिस्पर्धी टीम आमच्याबाबत काय विचार करते याची काळजी करत नाही. भारतानं जवळपास जगातील सर्व प्रमुख टीम विरुद्ध क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे संपूर्ण वेगळी रणनिती करण्याची गरज नाही.'
एका खेळाडूवर नाही तर टीमवर लक्ष
बांगलादेशच्या टीममध्ये नाहिद राणाचा समावेश करण्यात आलाय. तो सहजपणे ताशी 150 किमी वेगानं बॉलिंग करु शकतो. रोहितनं त्यालाही फारसं महत्त्व दिलं नाही. आमचं लक्ष एका खेळाडूवर नाही तर संपूर्ण टीमवर आहे, असं त्यानं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : बांगलादेशनं बदलला 22 वर्षांचा इतिहास, घरात घुसून पाकिस्तानला लोळवलं! )
'टीममध्ये काही नवे खेळाडू असतील. तुम्ही फक्त त्याच्यावर विचार करुन पुढं जाऊ शकता. बांगलादेशविरुद्धही आमची हीच योजना आहे. आम्ही संपूर्ण लक्ष खेळावर फोकस करणार आहोत,' असं रोहितनं स्पष्ट केलं.
या सत्रामध्ये एकूण 10 टेस्ट आहेत. त्यामुळे फास्ट बॉलर्सचं वर्क लोड मॅनेजमेंट ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं रोहित शर्मानं सांगितलं. 'सर्वोत्तम खेळाडूंनी सर्व सामने खेळावे अशी तुमची इच्छा असते, पण हे शक्य नाही. कारण क्रिकेट खूप खेळलं जातं. फक्त टेस्ट क्रिकेट नाही तर टेस्ट क्रिकेटमध्ये टी20 क्रिकेटही होत आहे. त्याचा विचार करुन तुम्हाला बॉलर्सचा वापर केला पाहिजे, असं रोहितनं सांगितलं.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world