जाहिरात

Rohit Sharma : आघाडीच्या अ‍ॅडल्ट स्टारची रोहित शर्माच्या बाजूनं बॅटिंग, दिला महत्त्वाचा सल्ला!

Kendra Lust on Rohit Sharma : टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्माचे फॅन्स सोशल मीडियावर त्याच्या बाजूनं बॅटिंग करत आहेत. त्याचवेळी रोहितला एक अनपेक्षित पाठिंबा मिळाला आहे.

Rohit Sharma : आघाडीच्या अ‍ॅडल्ट स्टारची रोहित शर्माच्या बाजूनं बॅटिंग, दिला महत्त्वाचा सल्ला!
मुंबई:

Kendra Lust on Rohit Sharma : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा नियमित कॅप्टन रोहित शर्माचा सध्या बॅड पॅच सुरु आहे. गेल्या काही महिन्यात रोहितच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं 6 पैकी 5 टेस्ट मॅच गमावल्या. तर एक अनिर्णित राहिली. रोहितची स्वत:ची कामगिरी देखील खराब झाली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 3 टेस्टमध्ये रोहितनं फक्त 31 रन केले. कोणत्याही विदेशी कॅप्टनची ऑस्ट्रेलियन मैदनावरील ही सर्वात खराब कामगिरी आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहित शर्मावर या खराब कामगिरीसाठी सातत्यानं टीका होत होती. त्यानंतर त्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील सिडनीमध्ये झालेल्या शेवटच्या टेस्टमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. अर्थात सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहितनं निवृत्तीबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

भारतीय कॅप्टनला तो मॅच फिट असताना टेस्ट सीरिजच्या दरम्यान टीमच्या बाहेर बसण्याची ही पहिलीच वेळ होती. रोहितच्या अनुपस्थितीनंतरही टीम इंडिया सिडनी टेस्टमध्ये पराभूत झाली. अवघ्या तीन दिवसांमध्ये टीम इंडियानं सिडनी टेस्ट आणि सीरिज गमावली. पण, सोशल मीडियावर रोहितच्या अनुपस्थितीचे मोठे पडसाद उमटले.

रोहित शर्माच्या बाजूनं पोस्ट करण्यात त्याचे फॅन्स आघाडीवर होते. त्याचबरोबर विद्या बालनसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीनंही रोहितच्या बाजूनं सोशल मीडिया हँडल X (पूर्वीचे नाव ट्विटर) वर रोहितच्या बाजूनं पोस्ट केली होती. 

( नक्की वाचा : 'आमचा कॅप्टन', बुमराहनं केलं रोहितचं असं वर्णन की जिंकलं संपूर्ण देशाचं मन )
 

विद्या बालनच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा असतानाच रोहितला सोशल मीडियावर अनपेक्षित पाठिंबा मिळाला आहे. आघाडीची  अ‍ॅडल्ट स्टार केंड्रा लस्टनं (Kendra Lust) देखील रोहितच्या बाजूनं पोस्ट केली आहे. 

तू भारतीय क्रिकेट विश्वाचा सुपपरस्टार आहेस. मजबूत राहा असा सल्ला केंड्रानं रोहितला दिला आहे. त्याचबरोबर तिने या पोस्टमध्ये रोहित शर्माला टॅग केलं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

रोहित शर्मा काय म्हणाला होता?

रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीची चर्चा सुरु आहे. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी रोहितनं दिलेल्या मुलाखतीमध्ये या चर्चेला पूर्णविराम दिला.

'कुणीतरी एक माणूस लॅपटॉप घेऊन बसलाय, माईक घेऊन बसलाय आणि पेन घेऊन बसलाय. ते काय लिहितात आणि बोलतात यामुळे आमचे जीवन बदलत नाही. ही लोकं ठरवू शकत नाही की आम्ही कधी जावं, आम्ही कधी खेळू नये किंवा आम्ही कधी बाहेर बसावे आणि आम्ही कधी संघ नेतृत्व करावे. मी सेन्सिबल, विचारी माणूस आहे. दोन मुलांचा बाप आहे. मला थोडंसं डोकं आहे आणि आयुष्यात मला काय करायचंय हे मला माहिती आहे'. असं रोहितनं या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com