जाहिरात

IND vs AUS : 'आमचा कॅप्टन', बुमराहनं केलं रोहितचं असं वर्णन की जिंकलं संपूर्ण देशाचं मन

Bumrah on Rohit Sharma : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.

IND vs AUS : 'आमचा कॅप्टन', बुमराहनं केलं रोहितचं असं वर्णन की जिंकलं संपूर्ण देशाचं मन
India vs Australia: Rohit Sharma and Jasprit Bumrah (फोटो - @AFP)
मुंबई:

Bumrah on Rohit Sharma : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित या सीरिजमध्ये सपशेल फेल गेला आहे. त्यामुळे सिडनी टेस्टमधील प्लेईंग 11 मध्ये रोहितचा समावेश करण्यात आला नाही. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. सिडनी टेस्टच्या टॉससाठी बुमराह मैदानात उतरला त्यावेळी टीममधील बदल सांगताना बुमराहनं रोहितबद्दल माहिती दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला बुमराह?

सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियानं दोन बदल केले आहेत. त्याबद्दल सांगताना बुमराह म्हणाला की, 'आमच्या कॅप्टननं मॅच न खेळता नेतृत्त्वगुण दाखवून दिला आहे. त्याचा निर्णय टीममधील एकोपा दाखवतो. आमच्याकडं कुणीही स्वार्थी नाही. टीमच्या सर्वोत्तम हिताचं जे काही असेल ते आम्ही करण्यास सज्ज आहोत. रोहितनं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय. तर आकाशदीप जखमी आहे. त्यामुळे त्याच्या जागी प्रसिधचा समावेश करण्यात आलाय,' असं बुमराहनं सांगितलं. 

बुमराहनं या उत्तरात रोहितची टीमबद्दलची बांधिलकी दाखवलीच. त्याचबरोबर ड्रेसिंग रुममधील मतभेदांची चर्चा सुरु असताना टीम एकत्र आहे, हा संदेश संपूर्ण देशाला दिला. 
 

रोहित का बाहेर?

रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजमध्ये फक्त 31 रन काढले आहेत. ऑस्ट्रेलियन पिचवरील टेस्ट सीरिजमध्ये कोणत्याही विदेशी कॅप्टननं काढलेले हे सर्वात कमी रन्स आहेत. रोहितला या सीरिजमध्ये सातत्यानं रन्स करण्यात संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे त्यानं बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. 

( नक्की वाचा : IND vs AUS : बुमराहला खुन्नस देत होता Konstas, कॅप्टनच्या उत्तरानं ऑस्ट्रेलियाचा थरकाप, Video )
 

मेलबर्न टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माच्या टेस्ट क्रिकेटमधील भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 1-2 नं मागे आहे. रोहित सिडनीतील सामन्यानंतर टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलाय. पण, रोहितनं सिडनी टेस्टमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला. 

भारतीय बॅटर्सची निराशा

सिडनी टेस्टमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायला उतरलेल्या टीम इंडियाच्या बॅटर्सनी पुन्हा एकदा निराशा केली. संपूर्ण टीम 185 रन्स काढून ऑल आऊट झाली. भारताकडून ऋषभ पंतनं सर्वाधिक 40 रन काढले. अनुभवी विराट कोहलीनं पुन्हा एकदा निराशा केली. तो 17 रन काढून आऊट झाला. कॅप्टन बुमराहनं 22 रनची झुंजार खेळी करत टीमला पावणे दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. 

ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. उस्मान ख्वाजाला फक्त 2 रनवर आऊट करत बुमराहनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियानं 1 आऊट 9 रन केले आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com