जाहिरात

IPL 2026: इंग्लंड गाजवणारा स्टार KKR च्या रडारवर, 'या' पद्धतीनं होणार समावेश?

KL Rahul, IPL 2026:  क्रिकेटच्या विश्वातून  एक मोठी बातमी समोर येत आहे.

IPL 2026: इंग्लंड गाजवणारा स्टार KKR च्या रडारवर, 'या' पद्धतीनं होणार समावेश?
IPL 2026: केकेआरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याचे संकेत आहेत.
मुंबई:

KL Rahul, IPL 2026:  क्रिकेटच्या विश्वातून  एक मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंड दौरा गाजवणारा टीम इंडियाचा अनुभवी बॅटर केएल राहुल आयपीएलच्या 19व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सऐवजी कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसू शकतो.  केकेआरची टीम आयपीएल 2026 साठी त्याला कोणत्याही परिस्थितीत ट्रेड करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी फ्रेंचायझीने आत्तापासूनच कंबर कसली आहे.

KKR ची होणार फेररचना

आयपीएलच्या मागील हंगामातील खराब प्रदर्शनानंतर केकेआरची टीमची फेररचना होणार आहे. यामुळेच दीर्घकाळापासून टीमचे हेड कोच असलेले चंद्रकांत पंडित आणि बॉलिंग कोच भरत अरुण यांच्याशी फ्रेंचायझीने संबंध तोडले आहेत. याशिवाय, केएल राहुलला ट्रेड करून अजिंक्य रहाणेऐवजी त्याला पुढील हंगामात कॅप्टन करण्याची तयारी फ्रेंचायझी करत असल्याची बातमीही समोर येत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाचे रिपोर्टर गौरव गुप्ता यांच्या मते, आयपीएल 2024 ची चॅम्पियन केकेआरची टीम दिल्ली कॅपिटल्सकडून या भारतीय फलंदाजाला ट्रेड करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.

( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )
 

अनेक समस्यांवर राहुल उपाय!

केएल राहुल केकेआरच्या टीममध्ये दाखल झाला, तर फ्रेंचायझीला त्यांच्या अनेक समस्यांवर उपाय मिळू शकतो. मागील हंगामात केकेआरच्या टीममध्ये क्विंटन डी कॉक आणि रहमानुल्लाह गुरबाजसारखे विकेट किपर बॅटर होते. पण त्यांना अपेक्षा पूर्ण करता आली नाही. 

राहुल विकेटकिपिर तसंच उत्तम ओपनर आहे. अशा परिस्थितीत त्याच्या आगमनाने केकेआरी विकेटकिंपिंग तसेच सलामीच्या जोडीची समस्या सुटेल.

( नक्की वाचा : WCL : टीम इंडियाचा ऐतिहासिक निर्णय, पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनल खेळण्यास दिला नकार!)
 

एवढेच नाही तर, गेल्या वर्षी कॅप्टन म्हणून अजिंक्य रहाणेला फारसा प्रभाव पाडता आला नाही. राहुलच्या आगमनानं केकेआरला नवा कॅप्टनही मिळेल. राहुलने आजवर टीम इंडियासह आयपीएलमधील अनेक संघांचे नेतृत्व केले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com