
आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (KKR vs LSG) हा सामना चांगलाच रंगतदार ठरला. लखनौ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 आऊट 238 रन्स केले. कोलकातानं (Kolkata Knight Riders) त्याचा निकारानं प्रतिकार केला. केकेआरचा या सामन्यात अवघ्या 4 रन्सनं पराभव झाला.
सुनील नरिन आणि क्विंटन डी कॉक यांनी केकेआरला आक्रमक सुरुवात करुन दिली. हे दोघं आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer ) यांनी धडाका सुरुच ठेवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रहाणेनं कर्णधारपदाला साजेसा खेळ करत 26 बॉलमध्येच हाफ सेंच्युरी पूर्ण केली. अजिंक्य 35 बॉलमध्ये 61 रन्स काढले. रहाणे आऊट झाल्यानंतर केकेआरची इनिंग घसरली. रमणदीप सिंह आणि अंगकृश रघुवंशी झटपट आऊट झाले. व्यंकटेश अय्यर रनरेट वाढवण्याच्या नादात 45 रन काढून आऊट झाला.
व्यंकटेश अय्यर आऊट झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंहवर केकेआरची भिस्त होती. शार्दुल ठाकूरनं रसेलला 7 रनवर आऊट केले. रसेल आऊट झाल्यानंतर रिंकू सिंहनं फटकेबाजी करत प्रतिकार केला पण, त्यांचा हा प्रतिकार फक्त 4 रननं अपुरा ठरला.
( नक्की वाचा : IPL 2025 : हार्दिक-तिलकची फटकेबाजी व्यर्थ, RCB नं पाडला मुंबईचा किल्ला, दमदार विजयासह केला रेकॉर्ड )
लखनौची दमदार बॅटिंग
लखनौ सुपर जायंट्सनं पहिल्यांदा बॅटिंग करत दमदार सुरुवात केली. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श यांनी आक्रमक सुरुवात केली. मारक्रमनं 28 बॉलमध्ये 47 रन काढले. मारक्रम आणि मार्श जोडीनं पहिल्या विकेटसाठी 62 बॉलची 99 रनची पार्टनरशिप केली.
मारक्रम आऊट झाल्यानंतर या सिझनमध्ये फॉर्मात असलेला मिचेल मार्श आणि ऑरेंज कॅपच्या लढतीमध्ये नंबर 1 वर असलेल्या निकोलस पूरनची जोडी जमली. मार्शनं 48 बॉलमध्ये 81 रन काढले. त्याचं आयपीएल करिअरमधील सातवं आणि या सिझनमधील चौथी हाफ सेंच्युरी आहे. मार्शनं या खेळीत 6 फोर आणि 5 सिक्स लगावले.
मार्थ आऊट झाल्यानंतरही पूरनची आक्रमक बॅटिंग सुरुच होती. त्यानं 36 बॉलमध्ये नाबाद 87 रन काढले. पूरननं या खेळीत 7 फोर आणि 8 सिक्स खेचले. त्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट होता 241.66. पूरनच्या या खेळीमुळेच लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 238 रन्स काढले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world