जाहिरात

Pune News : ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसणार! उपमुख्यमंत्र्यांचे बॉसच उतरले रिंगणात

Maharashtra Olympic Association election : महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री विरुद्ध केंद्रीय मंत्री अशी लढत आहे.

Pune News : ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसणार! उपमुख्यमंत्र्यांचे बॉसच उतरले रिंगणात
MOA Election: 2 नोव्हेंबर रोजी होणारी ही निवडणूक आता फक्त 'खेळ' राहिली नसून, ती प्रतिष्ठेची राजकीय लढाई बनली आहे.
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Maharashtra Olympic Association election : महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (MOA) अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे, 2 नोव्हेंबर रोजी होणारी ही निवडणूक आता फक्त 'खेळ' राहिली नसून, ती प्रतिष्ठेची राजकीय लढाई बनली आहे. 2025 ते 2029 या चार वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे.

कशी होणार निवडणूक?

या निवडणुकीत राज्यातील 22 अधिकृत राज्य क्रीडा संघटना मतदानास पात्र ठरल्या आहेत. मात्र, केवळ 60 मतदार आपला हक्क बजावणार असल्याने, अतिशय कमी मतदारांवर दोन तगड्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

न्यायप्रविष्ट वादांमुळे काही महत्त्वाच्या क्रीडा संघटना मतदानासाठी अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कब्बडी आणि कुस्ती या दोन राज्य संघटनांसह बॉक्सिंग, जलतरण, आणि हँडबॉल या संघटनांचा समावेश आहे.

( नक्की वाचा : Pune News : पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याला बायकोनेच प्रियकराच्या मदतीने संपवलं; हत्येचं कारण धक्कादायक )
 

ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, खो-खो, टेनिस, रायफल, रोईंग यांसारख्या 22 संघटनांचे प्रतिनिधी मतदानात सहभागी होणार आहेत.

अजित पवारांचा चौथ्या टर्मसाठी दावा

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार यांनी यापूर्वी सलग तीन वेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे, आणि आता ते चौथ्यांदा या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. पवार हे 2006 ते 2018 या काळात खो-खो संघटनेचे अध्यक्ष होते. नियमानुसार सात वर्षांचा 'कुलींग ऑफ पीरियड' पूर्ण केल्यानंतर, ते 2025 मध्ये पुन्हा या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून जोरदार लॉबिंग

भारतीय जनता पक्ष (BJP) आणि केंद्रात मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ हे पवारांना कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या विजयासाठी राज्यातील भाजप नेतृत्वाने पूर्ण ताकद लावली आहे.

Latest and Breaking News on NDTV

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले असून, त्यांनी विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची (मतदारांची) स्वतंत्र बैठक घेऊन मोहोळ यांच्या बाजूने जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा आहे.

ही निवडणूक केवळ दोन नेत्यांपुरती मर्यादित नसून, क्रीडा संघटनांमधील राजकारणावरही यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवार यांच्या मागील तीन टर्मच्या कार्यकाळावर गंभीर आरोप केले आहेत.

तडस यांनी अजित पवार यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, क्रीडा संघटनांवर राजकारण नसावे, केवळ माजी खेळाडूंनाच संधी मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 

फक्त 60 मतदारांवर दोन दिग्गजांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे केवळ क्रीडा संघटनांमध्येच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

अजित पवार यांची 'दादागिरी' या निवडणुकीत यशस्वी ठरणार, की मुरलीधर मोहोळ यांची 'चाल' यशस्वी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com