Joe Root Century : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये जो रुटनं (Joe Root) सेंच्युरी झळकावली. त्याची ही ऑस्ट्रेलियातील पहिली सेंच्युरी आहे. रुटनं यावेळी त्याच्या कारकीर्दीमधील एक मोठी पोकळी भरली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी बॅटर मॅथ्यू हेडननं दिलेलं आव्हानही पूर्ण केलं आहे.
हेडनने गंमत म्हणून असे म्हटले होते की, रूटने या ॲशेस सीरिजमध्ये सेंच्युरी केली नाही, तर तो मैदानात 'नग्न होऊन फिरेन'! (Walk Naked)रूटच्या सेंच्युरीनंतर हेडनच्या या वक्तव्याची आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
( नक्की वाचा : Joe Root : जो रुटचं मोठं स्वप्न पूर्ण, दत्त पौर्णिमेला सुटलं 12 वर्षांचं 'ग्रहण'! सचिनपासून किती मागं? )
हेडनने दिल्या खास शुभेच्छा
जो रूटने ब्रिस्बेनमध्ये सेंच्युरी पूर्ण करताच, इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत 'X' अकाउंटवरून त्याला हटके अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या. या पोस्टमध्ये मॅथ्यू हेडनची प्रतिक्रियाही समाविष्ट होती. हेडनने अत्यंत आनंदाने आणि पूर्ण मनाने रूटच्या या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की, रूटला ऑस्ट्रेलियामध्ये 100 रन बनवायला थोडा जास्त वेळ लागला, पण त्याचे 10, मग 50 आणि आता अखेरीस 100 रन पूर्ण झालेले पाहून त्याला खूप आनंद झाला आहे. हेडनने रूटला "छोटा रिपर" (Chhota Ripper) असे संबोधत त्याच्या या यशाचा मनसोक्त आनंद घेण्यास सांगितले.
🤳 (1) 𝗜𝗻𝗰𝗼𝗺𝗶𝗻𝗴 𝗺𝗲𝘀𝘀𝗮𝗴𝗲@HaydosTweets has something he'd like to say to Joe Root 😅 pic.twitter.com/0yPGk7JC5S
— England Cricket (@englandcricket) December 4, 2025
'MCG मध्ये नग्न होऊन फिरेन'
हा संपूर्ण किस्सा रूटच्या सेंच्युरीच्या आधी सुरू झाला होता. यूट्यूबवरील 'All Over Bar The Cricket' पॉडकास्टवर बोलताना, मॅथ्यू हेडनने स्वतःलाच एक आव्हान दिले होते. त्याने म्हटले होते की, जर रूट या सिझनमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सेंच्युरी झळकावण्यात अपयशी ठरला, तर तो मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मध्ये *'नग्न होऊन फिरेन'. हेडनचे हे वक्तव्य विनोदी असले तरी, क्रिकेट जगतात याची चांगलीच चर्चा झाली होती.
'तो' प्रश्न मिटला
जो रूटने ब्रिस्बेनमध्ये केलेल्या या सेंच्युरीमुळे त्याच्या महान खेळाडूच्या 'स्टेटस'वर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कसोटी क्रिकेटमधील 'ऑल-टाइम टेस्ट रन्स झळकवणाऱ्या यादीत रूटच्या वर आता फक्त महान बॅटर सचिन तेंडुलकर आहे.
सचिननं टेस्ट क्रिकेटमध्ये 15,921 रन केले आहेत. तर, 34 वर्षीय रूटच्या या आकड्याच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आता चाहत्यांना दिसत आहे. या मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियामध्ये रूटने 14 टेस्टमध्ये 35.68 च्या सरासरीने 892 रन केले होते. ऑस्ट्रेलियात टेस्ट सेंच्युरी नसणे ही त्याच्या फॅन्ससाठी मोठी गोष्ट नव्हती, पण आता या शतकाने त्याच्या कारकिर्दीतील एक मोठी पोकळी भरून काढली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world