जाहिरात

Joe Root : जो रुटचा 'महारेकॉर्ड', टेस्ट इतिहासात सचिन-पॉन्टिंगनंतर 'हा' पराक्रम करणारा तिसरा खेळाडू

Joe Root : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. या सीरिजमधील चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जो रुटनं ही ऐतिहासिक कामगिरी केली.

Joe Root : जो रुटचा 'महारेकॉर्ड', टेस्ट इतिहासात सचिन-पॉन्टिंगनंतर 'हा' पराक्रम करणारा तिसरा खेळाडू
Joe Root : इंग्लंडचा दिग्गज बॅटर जो रुटने एक मोठा पराक्रम केला आहे.
मुंबई:

Joe Root Third Highest Run Scorer in Test History: इंग्लंडचा दिग्गज बॅटर जो रुटने एक मोठा पराक्रम केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. या सीरिजमधील चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली. रुट आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रुटनं यावेळी  भारताचा महान बॅटर राहुल द्रविड (13,288 धावा) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज ऑल राऊंडर जॅक कॅलिस (13,289 धावा) यांना मागे टाकले. 13290 धावा करून रूटने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

( नक्की वाचा : Rishabh Pant : पंत झुकेगा नही! दुखापतीनंतरही मैदानात उतरला टीम इंडियाचा शेर, 'लॉर्ड' ठाकूरसोबतचा भावनिक Video Viral )
 

भारतासोबत सध्या सुरु असलेल्या टेस्ट सीरिजदरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. रूटने यावेळी भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड (13,288 धावा) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस (13,289 धावा) यांना मागे टाकले. 13290 धावा करून रूटने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

जर जो रूटने सध्याच्या इनिंगमध्ये आणखी 120 रन्स केले, तर तो ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग (13,378 रन्स) यालाही मागे टाकेल आणि तो सचिन तेंडुलकर (15,921 रन्स) नंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.

टेस्ट क्रिकेट इतिहासात सर्वाधिक रन्स करणारे बॅटर

सचिन तेंडुलकर - 15921 रन्स
रिकी पॉन्टिंग - 13378 रन्स
जो रूट - 13290* रन्स
जॅक कॅलिस - 13289 रन्स
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com