जाहिरात
Story ProgressBack

हार्दिक पांड्या घरी परतण्यापूर्वी पत्नी नताशानं पोस्ट केला Video, घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

Read Time: 2 mins
हार्दिक पांड्या घरी परतण्यापूर्वी पत्नी नताशानं पोस्ट केला Video, घटस्फोटाच्या चर्चेला उधाण
Natasa Stankovic and Hardik Pandya
मुंबई:

अभिनेत्री-मॉडल तसंच क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी  नताशा स्टेनकोविकनं (Natasa Stankovic) नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  या व्हिडिओमध्ये तिनं आयुष्यातील काही परिस्थितीमधून जाता निराश आणि दु:खी होण्याच्या ऐवजी परमेश्वरावर विश्वास ठेवावा असा सर्वांना सल्ला दिला आहे. नताशा आणि तिचा नवरा हार्दिक पांड्या वेगळे होणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेमध्येच तिनं हा मेसेज केलाय. 

नताशानं हा व्हिडिओ कारमधून प्रवास करताना तयार केलाय. त्यामध्ये नताशा म्हणते, 'मी आज एक खास गोष्ट वाचण्यासाठी खूप उत्साहित होते. मला त्याची प्रत्यक्षात खूप गरज होती. त्यामुळे मी कारमध्ये बायबल घेऊन आली आहे. मला हे तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याची इच्छा आहे.'

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नताशा पुढं म्हणाली की, 'हा परमेश्वरच तुम्हाला पुढं नेतो. तो तुमच्यासोबत राहील. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुमचा त्याग करणार नाही. घाबरु नका, निराश होऊ नका.' या विषयावर बोलताना नताशा पुढं म्हणाली, 'आपण एखाद्या खास परिस्थितीमधून जाताना धैर्य गमावतो. निराश आणि दु:खी होतो त्यावेळी परमेश्वर तुमच्यासोबत असतो. तुम्ही आत्ता काय करत आहात ते पाहून हैराण होऊ नका. कारण त्याच्याकडं पूर्वीपासूनच एक योजना आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाची अफवा काही दिवसांपासून सुरु आहे. भारतीय क्रिकेट टीमनं नुकताच टी20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर हार्दिक पांड्या किंवा भारतीय टीमचं अभिनंदन करणारी पोस्ट नताशानं सोशल मीडियावर शेअर केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ते वेगळं होणार ही चर्चा सुरु झाली. 

( नक्की वाचा : Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप? )
 

हार्दिकनं 2020 साली दुबईमध्ये नताशाला प्रपोच केलं होतं. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये या दोघांनी लग्न केलं. या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकलेली भारतीय क्रिकेट टीम आजच (गुरुवार, 4 जुलै) मायदेशी परतली आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
वादळात अडकलेल्या टीम इंडियाला घेऊन एअर इंडियानं कसं केलं उड्डाण? Inside Story
हार्दिक पांड्या घरी परतण्यापूर्वी पत्नी नताशानं पोस्ट केला Video, घटस्फोटाच्या चर्चेला उधाण
why-pm-modi-not-touch-the-t20-world-cup-trophy-discussion-on-social-media
Next Article
PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? BJP ला इंदिरा गांधींची आठवण का आली?
;