जाहिरात
Story ProgressBack

विराट किंवा रोहित नाही तर 'हा' आहे Pat Cummins चा आवडता भारतीय क्रिकेटपटू

Pat Cummins : वर्ल्ड कप विजेता कॅप्टन असलेल्या कमिन्सला एका मुलाखतीमध्ये आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Read Time: 2 min
विराट किंवा रोहित नाही तर 'हा' आहे Pat Cummins चा आवडता भारतीय क्रिकेटपटू
Pat Cummins : पॅट कमिन्स या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन आहे.
मुंबई:

वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये (ODI WC 2023) सर्व भारतीयांना रडवणारा ऑस्ट्रेलियन कॅप्टन म्हणजे पॅट कमिन्स (Pat Cummins).  कमिन्स सध्याच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स टीमचं नेतृत्त्व करतोय. कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली सनरायझर्सनं सुरुवातीच्या टप्प्यात चमकदार कामगिरी केलीय. आयपीएल 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी त्यांना पुढील सर्व सामने महत्त्वाचे आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वर्ल्ड कप विजेता कॅप्टन असलेल्या कमिन्सला एका मुलाखतीमध्ये आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यानं महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यापैकी एकाही दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेतलं नाही. 'मी एक फास्ट बॉलर आहे. त्यामुळे मी बॉलरचंच नाव घेईल असं म्हणत कमिन्सनं जसप्रीत बुमराह हा त्याचा आवडता क्रिकेटपटू असल्याचं कमिन्सनं 'ह्यूमन ऑफ बॉम्बे' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. तरुण भारतीय खेळाडूंमध्ये कमिन्सनं अभिषेक शर्माचं नाव घेतलं. अभिषेक कमिन्सच्याच कॅप्टनसीमध्ये सनरायझर्सकडून या सिझनमध्ये खेळतोय.

( नक्की वाचा : शाकिब कधी सुधारणार नाही! सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅन्सचा पकडला गळा, Video )
 

जसप्रीत बुमराहनं या आयपीएल सिझनमध्ये आत्तापर्यंत 12 मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्यात. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीही सातत्यानं रन्स करतोय. विराटनं 11 मॅचमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकाच्या मदतीनं 542 रन केले आहेत. तर रोहित शर्माचा सध्या धावांसाठी संघर्ष सुरु आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद पटकावण्यासाठी या तिघांनाही मोठी कामगिरी करावी लागणार आहे.

तर, पॅट कमिन्स आज (बुधवार 8 मे) रोजी 31 वर्षांचा झालाय. कमिन्ससाठी 2023 हे वर्ष भलंतच यशस्वी झालं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वन-डे वर्ल्ड कप या दोन मोठ्या स्पर्धेत कमिन्सच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं विजेतेपद पटकावलंय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination