जाहिरात
Story ProgressBack

शाकिब कधी सुधारणार नाही! सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅन्सचा पकडला गळा, Video

Shakib Al Hasan Angry reaction : बांगालादेशचा ऑल राऊंडर शाकिब अल हसन पुन्हा एकदा वादात सापडलाय.

Read Time: 2 min
शाकिब कधी सुधारणार नाही! सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅन्सचा पकडला गळा, Video
Shakib Al Hasan शाकिब अल हसन फॅनवर संतापला (फोटो सौजन्य : ट्विटर)
मुंबई:

Shakib Al Hasan Angry reaction viral:  बांगालादेशचा ऑल राऊंडर शाकिब अल हसन हा नेहमीच त्याच्या संतापी स्वभावामुळे चर्चेत असतो. शाकिबनं त्याच्या तापट स्वभावाचं दर्शन यापूर्वीही घडवलं आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये शाकिबनं पुन्हा एकदा मर्यादा ओलांडल्या आहेत. या व्हिडिओत शाकिब त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राऊंड्समनवर संतापलाय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शाकिबनं त्याच्यावर हात उगारला. त्याचा गळा पकडला आणि हात उगारत त्याला अपमानित केलं. शाकिबच्या रागाला बळी पडलेला हा व्यक्ती त्यानंतर बेंचवर जाऊन बसतो. त्यावेळी बांगलादेशाच्या दिग्गज खेळाडूकडून मिळालेल्या वागणुकीबद्दलची निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. 

आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी शाकिब सध्या ढाका प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळतोय. या लीगमध्ये तो शेख जमाल धनमोंडी क्लबचं प्रतिनिधित्व करत आहे. प्राईम बँकच्या विरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी त्यानं ग्राऊंड्समनशी गैरव्यवहार केला. 

शाकिब टॉसपूर्वी धनमोंडी क्लबचे कोच सलाउद्दीनशी चर्चा करत होता. त्यावेळी हा ग्राऊंड्समन शाकिबच्या जवळ आला आणि त्यानं सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर शाकिब नाराज झाला आणि त्याचा गळा पकडून त्याच्यावर हात उगारला. शाकिबच्या वागणुकीचा धक्का बसलेली ती व्यक्ती बेंचवर जाऊन बसते. शाकिब मात्र काही घडलंच नाही या थाटात कोचशी पुन्हा चर्चा करत होता. 

( नक्की वाचा : रोहित शर्मा खरंच रडत होता? Viral Video पाहून फॅन्सना धक्का )

बांगलादेशची टीम सध्या झिम्बाब्वेविरुद्ध T20 सीरिज खेळत आहे. शाकिब ही सीरिज खेळत नाहीय. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशनं अद्याप टीमची घोषणा केलेली नाही. बांगलादेशची टीम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination