मनू भाकरनं (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारतीयांची मान उंचावणारी कामगिरी केली आहे. मनूनं रविवारी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकत भारताला पहिलं पदक जिंकून दिलं. त्यापाठोपाठ याच प्रकरातील मिश्र गटात सरबजोत सिंगच्या ( Sarabjot Singh) जोडीनं आणखी एका ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी मनू ही पहिली भारतीय आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात आजवर कुणालाही न जमलेली कामगिरी मनूनं केली आहे.
टोक्यो ऑलिम्पिकच्या दरम्यान मनूचं पिस्टल बिघडलं होतंं. या धक्कादायक प्रकारानं तिची मेडल जिंकण्याची संधी हुकली. या घटनेनंतर मनू आणि जसपाल यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर या दोघांनी हा वाद मिटवत पुन्हा एकत्र सराव केला. त्याचा फायदा मनूला झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनूच्या यशात सिंहाचा वाटा असलेले तिचे कोच जसपाल राणा सध्या पूर्णवेळ नोकरी शोधत आहेत. त्यांना गेल्या 3 वर्षांपासून पगार मिळालेला नाही. स्वत: राणा यांनी 'Rev Sportz' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे.
'शिव्या देणाऱ्यांना माझी मुलाखत हवीय'
'टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तो प्रकार घडला त्यावेळी मी तिथं उपस्थितही नव्हतो. त्यानंतरही मला अनेकांनी व्हिलन ठरवलं. त्यावेळी मला ज्यांनी शिवीगाळ केली ते आज माझी मुलाखत घेण्यासाठी ताटकळत आहेत. काही हरकत नाही. मी मुलाखत दिली. पण, ही मंडळी माझं झालेलं मोठं नुकसान भरुन काढणार आहेत का?' असा सवाल त्यांनी विचारला.
मनू राणाला ऑलिम्पिक पदक मिळाल्यानं जसपाल राणाही आनंदी आहेत. त्याचवेळी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) किंवा देशातील अन्य क्रीडा संस्थेनं गेल्या तीन वर्षांपासून मला कोणताही पगार दिलेला नाही. त्यामुळे नोकरी शोधणे हा माझा सध्या मुख्य फोकस आहे, असं राणा यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं )
'मी कुणीही नाही. मी फक्त मनूला तिला हवी ती मदत केली. पण, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया किंवा अन्य कोणत्याही संस्थांनी मला गेल्या तीन वर्षांपासून पगार दिलेला नाही, हे लोकांना माहिती आहे का? मनू काय करु शकते हे तिनं दाखवून दिलं आहे. त्याचा मला आनंद आहे. मी फक्त ती तिच्या क्षमतेचा उपयोग करेल हे पाहिलं. मला आता भारतामध्ये जाऊन नव्यानं सुरुवात करायची आहे. मला पैसे मिळवण्यासाठी नोकरी शोधणं आवश्यक आहे,' असं राणानं सांगितलं.
'मला पीटी उषा मॅडम आणि कॅप्टन अजय नारंग यांच्यामुळे IOA कडून ऑलिम्पिक स्विकृतीपत्रक मिळालं त्याबद्दल त्यांचे आभार. पण, त्यानंतरही मला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे मलाच माहिती आहे,' असा खुलासा जसपाल राणानं केला.
( नक्की वाचा : पिस्तुलाने दिलेला धोका ते कांस्य पदक... मनू भाकरची दोन ऑलिम्पिकमधील कहाणी )
'मी कुणीच नाही'
या मुलाखतीच्या दरम्यान जसपाल राणा चांगलेच भावुक झाले होते. मनू स्टार आहे. मी कुणीही नाही. मी रोजच्या जगण्यासाठी धडपड करणारा व्यक्ती आहे,' असं त्यांनी सांगितलं.
'मनू स्टार आहे. मी फक्त नोकरी नसलेला कोच आहे. मी कुणीही नाही. मनूनं माझी मदत मागितली होती. मला आता तातडीनं नोकरीची गरज आहे. गेली तीन वर्ष माझ्यासाठी अत्यंत खडतर होती. त्याबद्दल मला आयुष्यात कधीही बोलावं असं वाटत नाही,' असं त्यांनी सांगितलं.
'मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी तेव्हा टोक्योमध्येही नव्हतो. त्यावेळी मला शिवीगाळ तसंच ट्रोल करणारी मंडळी माझ्या आयुष्यातील शांतता परत आणून देणार आहेत का? कधीही नाही.' असं भावुक उत्तर जसपाल राणा यांनी एका प्रश्नाला दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world