जाहिरात

Paris Olympics 2024 : अमन सेहरावत उपांत्यफेरीत, अल्बानियाच्या कुस्तीपटूला 12-0 ने केले पराभूत

57 किलोग्रॅम वजनी गटामध्ये अमनने उपांत्य फेरी गाठली आहे.

Paris Olympics 2024 : अमन सेहरावत उपांत्यफेरीत, अल्बानियाच्या कुस्तीपटूला 12-0 ने केले पराभूत
मुंबई:

Paris Olympics 2024 Day 13 Live Updates: भारतासाठी पदकाची आणखी एक आशा निर्माण झाली आहे. अमन सेहरावत हा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 57 किलोग्रॅम वजनी गटामध्ये अमनने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने अल्बानियाच्या प्रतिस्पर्ध्याचा 12-0 ने पराभव केला आहे. जेलिमखान अबकारोव या प्रतिस्पर्ध्याला अमनने एकही गुण मिळू दिला नाही. अमनचा उपांत्य फेरीतील मुकाबला जपानच्या नामवंत कुस्तीपटू हिगुआची रेई याच्याशी होणार आहे.  गुरुवारी भारताच्या अंशू मलिक हिचादेखील सामना होता, मात्र तिला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अंशूचा अमेरिकेच्या हेलेन मेरॉलिसने पराभव केला. 

उपांत्यपूर्व सामन्यात अमनने सुरूवातीपासूनच जबरदस्त कामगिरी केली. अमनचा आक्रमक पवित्रा पाहून त्याचा प्रतिस्पर्धी हा बचावात्मक पवित्रा घेऊन खेळताना दिसला. तो बचावात्मक खेळ करत असल्याचे पाहून अमनने पहिल्या फेरीत 3-0 ने आघाडी घेतली होती. ही आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम राखली होती. दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला देखील अमनने आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. 'फितले डाव' टाकल्याने अमेनला 11 गुणांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या वरचढ असल्याने अमनला विजेता घोषित करण्यात आले. या सामन्यापूर्वीच्या सामन्यात अमनचा मुकाबला मॅसेडोनियाच्या व्लादीमीर इगोरोवशी झाला होता. हा सामनाही अमनने आरामात जिंकला होता. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात अमनला कडवी झुंज द्यावी लागेल असं वाटत होतं, मात्र हा सामना देखील अमनने आरामात जिंकला. अमन आणि व्लादीमीर यांच्यात झालेला सामना हा निर्धारीत वेळेपूर्वीच संपला होता. या सामन्यातही अमनने आक्रमक खेळ केल्याने व्लादीमीर हा बचावात्मक खेळ करताना दिसला होता. बचावात्मक खेळ करणे आणि संधी मिळताच चढाई न करण्याचा फटका व्लादीमीरला बसला होता कारण पंचांनी अमनला पॅसिटीव्हिटीसाठी अमनला 2 अंक बहाल केले होते. याचा फायदा उचलत अमनने आपली आघाडी वाढवत नेली आणि सामना 10-0 ने जिंकला.  

भारताला आज एकूण 2 पदके मिळतील अशी आशा आहे. भारतीय हॉकी संघाचा स्पेनशी कांस्य पदकासाठी मुकाबला होणार आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर भारताच्या पदकतालिकेत आणकी एका पदकाची भर पडेल. सगळ्या भारताचं लक्ष हे भालाफेकपटू आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राकडे लागलेले असेल. नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिले स्थान मिळवले होते. तो पुन्हा एकदा भारताला सुवर्ण पदक मिळवून देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com