पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील (Paris Olympics 2024) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतातून मनू भाकर आज अंतिम सामन्यात नेम धरणार आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिलं पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मनू भाकरनं (Who is Manu Bhakar) 580 पॉईंट्स मिळवत तिसऱ्या क्रमांकासह स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये प्रवेश केलाय.
मनू भाकर गेल्या 20 वर्षांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत ऑलिम्पिंकच्या फायनलमध्ये पोहचलेली पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. यापूर्वी सूमा शिरुरनं 2004 साली अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पुरुष तिरंदाजांनी रँकिंग राऊंडमध्ये टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिलं पदक मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Paris Olympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन कार्यक्रमावर कंगना रनौत का संतापली?
मनू भाकर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पहिल्या दिवशी अन्य भारतीय नेमबाजांनी अपेक्षाभंग केला. पण, मनू भाकरनं तिच्या लौकिकाला साजेसा खेळ केला. तिनं 10 पॉईंट्सच्या इनर सर्कलमध्ये 27 वेळा नेम (Bull's Eye) साधत फायनलमध्ये तिसऱ्या क्रमांकासह मोठ्या दिमाखात प्रवेश केला. रविवारी या गटातील टॉप 8 स्पर्धक फायनलमध्ये खेळतील. पात्रता फेरीतील खेळाची पुनरावृत्ती मनूनं या राऊंडमध्येही केली तर ती भारताला नक्की पदक मिळवू शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world