Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत 3 मेडल मिळाले आहेत. हे तिन्ही मेडल शूटिंगमध्ये मिळाली आहेत. भारतासाठी मनू भाकरनं (Manu Bhaker) शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून देशाचं खातं उघडलं. आत्तापर्यंत मनू भाकर, सरबजोत सिंग आणि स्वप्नील कुसाळे यांनी भारतासाठी मेडल जिंकलं आहे.
भारताकडून मेडलचे दावेदार कोण आहेत ते पाहूया
लक्ष्य सेन (Lakshya Sen)
बॅडमिंटपटू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याची सेमी फायनलमध्ये लढत विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध होणार आहे. लक्ष्यची या स्पर्धेतील कामगिरी दमदार झालीय. त्यानं सेमी फायनलमध्ये विजय मिळवल्यास त्याचं मेडल नक्की होईल.
भारतीय हॉकी टीम (Indian Hockey Team)
भारतीय हॉकी टीम क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाली आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताची लढत ब्रिटनशी होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताचा सेमी फायनलमध्ये प्रवेश होईल. त्यानंतर हॉकी टीमला मेडल जिंकण्याची संधी असेल.
( नक्की वाचा : मनू भाकरसोबत भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून देणारा सरबजोत सिंग कोण आहे? )
लवलीन बोरगोहेन ( Lovlina Borgohain )
बॉक्सर लवलीन बोरगोहेनकडंही देशासाठी मेडल जिंकण्याची संधी आहे. लवलीन सध्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे. सध्या ती मेडलपासून एक विजय दूर आहे. क्वार्टर फायनलमधील विजय तिचं मेडल नक्की करेल.
नीरज चोप्रा ( Neeraj Chopra )
भालाफेकपटू नीरज चोप्रा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकून देऊन शकतो. संपूर्ण देशाला नीरजकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नीरजची पात्रता फेरी 6 ऑगस्ट तर फायनल 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
मीराबाई चानू ( Saikhom Mirabai Chanu )
टोक्यो ऑलिम्पकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी वेटलिफ्टर मीराबाई चानूकडूनही देशाला मेडलची अपेक्षा आहे.
( नक्की वाचा : Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं )
विनेश फोगाट ( Vinesh Phogat )
कॉमवेल्थ स्पर्धेचं तीन वेळा विजेतेपद पटकावणारी विनेश फोगाट 50 किलो वजनी गटात खेळणार आहे. भारताला मेडल देऊ शकणाऱ्या ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये विनेशचाही समावेश आहे. विनेशमध्येही ऑलिम्पिक मेडल जिंकण्याची क्षमता आहे.
अंतिम पंघाल (Antim Panghal )
कुस्तीपटू अंतिम पघालकडूनही मोठी अपेक्षा आहे. तो 53 किलो वजनी गटात मेडलचा दावेदार आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये किती मेडल
यापूर्वी जपानची राजधानी टोक्योमध्ये भारतानं एकूण 7 मेडल्स जिंकली होती. यामध्ये 1 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ मेडलचा समावेश होता. टोक्योचा रेकॉर्ड मोडण्याची मोठी संधी यंदा भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world