पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) चौथा दिवस (30 जुलै) भारतासाठी खास ठरला. मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबजोत सिंग (Sarabjot Singh) या जोडीनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारातील मिश्र गटात ब्रॉन्झ मेडल मिळवलं. या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचं हे दुसरं मेडल आहे. यापूर्वी मनूनं याच प्रकारातील महिलांच्या एकेरी स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनीच मनूनं सरबजोतच्या जोडीनं आणखी एका ब्रॉन्झ मेडलला गवसणी घातली.
Bronze for team India in the 10m Air Pistol Mixed Team match!
— SAI Media (@Media_SAI) July 30, 2024
Manu and Sarabjot with some fantastic shooting to land India's second medal of the #Paris2024Olympics! pic.twitter.com/WhFPY7mNa7
शेतकऱ्याचा मुलगा कसा बनला बंदूकबाज?
सरबजोत सिंग सध्या 22 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 30 सप्टेंबर 2001 रोजी हरयाणामधील अंबाला जिल्ह्यातील धीन या गावात झाला. त्याचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत. तर आई हरदीप कौर गृहिणी आहे. सरबजोतनं चंदिगडच्या DAV कॉलेजमधून आर्ट्स शाखेतील पदवी पूर्ण केली आहे. अंबालामधील अभिषेक राणा हे त्याचे कोच आहेत. त्यांच्या AR कोचिंग अकादामीमध्ये त्यानं प्रशिक्षण घेतलं आहे.
सरबजोतला सुरुवातीला फुटबॉलपटू व्हायचं होतं. तो 13 वर्षांचा असताना एका समर कॅम्पमध्ये त्यानं काही मुलांना शूटिंगचा सराव करताना पाहिलं. ते पाहून त्यानं याच खेळात करियर करण्याचा निर्णय घेतला. 2019 साली झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सरबजोतनं गोल्ड मेडल पटकावले होते. हा त्याच्या कारकिर्दीमधील टर्निंग पॉईंट ठरला.
( नक्की वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं )
पहिलंच ऑलिम्पिक
सरबजोतनं 2023 मधील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत वैयक्तिक ब्रॉन्झ मेडलची कमाई केली होती. या कामगिरीच्या जोरावर तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. सरबजोतची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
( नक्की वाचा : धक्कादायक! Manu Bhakar चे कोच नोकरीच्या शोधात, 3 वर्षांपासून मिळाला नाही पगार )
वैयक्तिक स्पर्धेत मेडल मिळवण्यात सरबजोतला अपयश आलं. त्यानंतर मनू भाकरसोबत मिश्र गटात त्यानं हे अपयश पुसून टाकलं. मनू-सरबजोत जोडीनं दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओह ये जीन जोडीचा 16-10 असा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामगिरीबद्दल दोघांचं अभिनंदन केलं आहे
Our shooters continue to make us proud!
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
Congratulations to @realmanubhaker and Sarabjot Singh for winning the Bronze medal in the 10m Air Pistol Mixed Team event at the #Olympics. Both of them have shown great skills and teamwork. India is incredibly delighted.
For Manu, this… pic.twitter.com/loUsQjnLbN
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world