पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक यशस्वी तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळे याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्यं पदक मिळालं आहे. भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. 50 मीटर एअर रायफल तिसऱ्या पोझिशनमध्ये स्वप्निलने कांस्य पदक मिळवलं आहे.
50 मीटर रायफल तीन पोझिशन शूटिंगच्या अंतिम सामन्यात जबरदस्त सादरीकरणासह स्वप्निल कुसाळेने कांस्य पदकावर मोहोर उठवली आहे. कुसाळेने 50 मीटर रायफल तीन पोझिशन शूटिंगमध्ये 451.4 गुण मिळवून कांस्यपदक मिळवलं आहे. याशिवाय युक्रेनचा एस. कुलीश 461.3 गुणांसह दुसऱ्या क्रमांकवर आहे. चीनचा वाय.के. ल्यू 463.6 गुणांसह पहिल्या क्रमांकचं सुवर्णपदक मिळवलं आहे.
Indian shooter Swapnil Kusale wins Bronze medal at Men's 50m Rifle #Paris2024Olympic pic.twitter.com/qYKDBEJtPq
— ANI (@ANI) August 1, 2024
नक्की वाचा - Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं
50 मीटर रायफल थ्री पोजिशन हा प्रकार कठीण का मानला जातो. या प्रकारामध्ये नेमबाजांना तीन वेगवेगळ्या पोजिशन्सवरुन नेम साधायचा असतो. Knelling (गुडघ्यावर बसून नेम), Prone (झोपून) आणि Standing (उभं राहून) या तीन प्रकारात नेम साधला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रकारात आपलं लक्ष्य विचलीत न होऊ देता योग्य नेम साधणं हे नेमबाजासाठी आव्हानात्मक असतं. अनेकदा चांगली सुरुवात करुन काही नेमबाज नंतर गुणांमध्ये खाली घसरतात. स्वप्निल पदकाच्या फेरीमध्ये सुरुवातीला 5-6 व्या स्थानावर वर-खाली करत होता. परंतु मोक्याच्या क्षणी त्याने जिरी प्रिव्रात्स्की आणि जॉन हर्मन या दोन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिसरं स्थान मिळवलं. पाचव्या आणि सहाव्या फेरीत स्वप्निलचं लक्ष्य थोडसं विचलित झालं, ज्यामुळे त्याचा नेम 10 गुणांवरुन 9 गुणांवर आला. यात चीन आणि युक्रेनच्या प्रतिस्पर्ध्याने आपल्या पहिल्या व दुसऱ्या स्थानावरची पकड घट्ट बसवली. परंतु गरजेच्या वेळेस स्वप्निलने 10 गुणांची कमाई करत आपलं पदक निश्चित केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world