जाहिरात

Rahul Dravid Exclusive : प्रत्येकाला लवकर प्रसिद्ध व्हायचं असतं, पण.... द्रविडचा क्रिकेटपटूंना सल्ला, Video

Rahul Dravid Exclusive Interview : राहुल द्रविडनं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये तरुण क्रिकेटपटूंना कानमंत्र दिला आहे.

Rahul Dravid Exclusive : प्रत्येकाला लवकर प्रसिद्ध व्हायचं असतं, पण.... द्रविडचा क्रिकेटपटूंना सल्ला, Video
वर्धा:

निलेश बंगाले, प्रतिनिधी

Rahul Dravid Exclusive Interview :  टीम इंडियाचाच नाही तर क्रिकेट विश्वातील ऑल टाईम ग्रेट खेळाडू म्हणून राहुल द्रविड ओळखला जातो. द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं 2024 मधील T20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप विजेतेपदासोबतच द्रविडच्या भारतीय टीमसोबतच्या दुसऱ्या इनिंगची सांगता झाली. तो आता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या आयपीएल टीमचा हेड कोच आहे.

वर्धा जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये राजस्थान रॉयल्सची खास अकादमी आहे. या अकादमीमध्ये राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सराव करतात. राजस्थान रॉयल्सचा कोच असलेला द्रविड या अकादमीमध्ये आला त्यावेळी त्यानं 'NDTV मराठी' चे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याशी खास बातचित केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

क्रिकेट विश्वातील चालता-बोलता आदर्श असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या द्रविडनं यावेळी बोलताना तरुण खेळाडूंनी आयुष्यभर लक्षात ठेवावा असा कानमंत्र दिला आहे. 

भारतामध्ये गुणवत्ता आणि पुढं जाण्याची इच्छाशक्ती खूप आहे. मुलांप्रमाणेच मुलींमध्येही ही इच्छाशक्ती आहे. त्यासाठी या प्रकारच्या सूविधा लहान शहरांमध्येही हव्या आहेत. खूप कमी जण आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात. पण, सर्वांना संधी निर्माण व्हायला पाहिजे. त्यांना संधी मिळाली तर त्यांना कठोर परिश्रम, शिस्त या गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा त्यांना आयुष्यातील पुढील कालावधीमध्ये उपयोग होतो, असं द्रविडनं सांगितलं. 

( नक्की वाचा : विनोद कांबळीची कारकिर्द सचिनसारखी बहरली का नाही? राहुल द्रविडनं सांगितलं होतं कारण, Video )

कठोर परिश्रम करावेच लागतील पण...

तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतील. त्यासाठी शिस्त हवी होते. तुम्ही कष्ट करु शकता पण निकाल आपल्या हातामध्ये नसतो. त्यासाठी संयम हवा. नव्या पिढीतील अनेकांना लवकर निकाल हवा असतो. प्रत्येकाला लवकर प्रसिद्ध व्हायचं असतं. लगेच प्रसिद्धी अनेकांना होत नाही. त्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात. त्यासाठी वेळ आणि संयम लागतो. काही जणांना हे लवकर मिळतं, पण काही जणांना यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्याची तुम्हाला समज हवी. 

तुम्ही आज कठोर परिश्रम घेतले की उद्या लगेच निकाल मिळेल असं नसतं. त्यासाठी तुमचे प्रयत्न लागतात. तुम्ही प्रयत्नच करु शकता. निकाल आपल्या हातामध्ये नाही, तुम्ही प्रयत्न केले आणि तरी एखादी गोष्ट झाली नाही तरी तुम्ही जे शिकता त्या गोष्टी दुसरीकडेही आपल्याला उपयोगी पडतात, असा कानमंंत्र द्रविडनं तरुण खेळाडूंना दिला.  

राहुल द्रविडची पूर्ण मुलाखत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: