जाहिरात

Ranji Trophy : अजिंक्य, सूर्या आणि शिवमला एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा Parth Rekhade कोण आहे?

विदर्भाचा अनोळखी स्पिनर पार्थ रेखाडे (Parth Rekhade) नं एकाच ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणे (Ajnikya Rahane), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांना आऊट करत मुंबईची अवस्था बिकट केली.

Ranji Trophy : अजिंक्य, सूर्या आणि शिवमला एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा Parth Rekhade कोण आहे?
मुंबई:


Vidarbha vs Mumbai, 2nd semi final : नागपूरमध्ये विदर्भ विरुद्ध मुंबई या दोन महाराष्ट्रातील टीममध्ये रणजी ट्रॉफीची सेमी फायनल सुरु आहे. या मॅचच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची अवस्था बिकट आहे. 42 वेळा ही स्पर्धा जिंकणारी मुंबईची त्यांच्या अनुभवी मिडल ऑर्डरवर भिस्त होती. पण, विदर्भाचा अनोळखी स्पिनर पार्थ रेखाडे (Parth Rekhade) नं एकाच ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणे (Ajnikya Rahane), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांना आऊट करत मुंबईची अवस्था बिकट केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिवसभरात काय झालं?

विदर्भानं पहिल्या दिवशी 5 आऊट 303 रन केले होते. दुसऱ्या दिवशी या स्कोअरमध्ये आणखी 75 रनची भर टाकत विदर्भाची संपूर्ण टीम आऊट झाली. विदर्भानं केलेल्या 383 रन्सचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था नाजूक झाली आहे. मुंबईनं दुसऱ्या दिवशी 7 आऊट 188 रन केले. विदर्भाकडे पहिल्या इनिंगमध्ये अद्याप 195 रन्सची आघाडी आहे. या मॅचचा निकाल न लागल्यास पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेणारी टीम फायनलमध्ये प्रवेश करेल.

( नक्की वाचा : Ajinkkya Rahane : 'आई पैसे कमावण्यासाठी दुसऱ्यांची मुलं सांभाळत असे,' अजिंक्यचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी! )

विदर्भाचा नवोदीत स्पिनर पार्थ रेखाडे आजच्या दिवसाचा हिरो ठरला. त्यानं एकाच ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दिग्गजांना आऊट करत मुंबईच्या मिडल ऑर्डरला खिंडार पाडलं. सूर्या आणि शिवमला तर भोपळाही फोडता आला नाही.

कोण आहे पार्थ रेखाडे?

आश्चर्याची बाब म्हणजे बलाढ्य मुंबईला बॅकफुटवर ढकलणारा पार्थ हा नवोदीत खेळाडू आहे. हा त्याचा दुसराच फर्स्ट क्लास सामना आहे. त्यानं पहिला सामना हैदराबाद विरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्यानं 4 विकेट्स घेतल्या आणि दोन्ही इनिंगमध्ये मिळून 54 रन केले. मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये पार्थनं पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत 23 रन केले होते.

पार्थचा जन्म 19 जुलै 1999 रोजी नागपूरमध्ये झाला. त्यानं अंडर-19 क्रिकेट टीममध्येही विदर्भाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या टीममधील प्रभावी कामगिरीच्या जोरावरच पार्थची विदर्भाच्या सिनिअर टीममध्ये निवड झाली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: