RCB Name Change: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं नाव बदलणार? नव्या मालकांनी काय सांगितलं?

IPL 2026: आयपीएल 2025 चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ची तब्बल 16,706 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून 100% मालकी हक्क विकत घेतले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2026: आयपीएलचा गतविजेता संघ असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या मालकी हक्कांचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. हा संघ आता जगातील सर्वात महागडा क्रिकेट संघ ठरला आहे. आदित्य बिर्ला समूहाने (ABG) विक्रमी बोली लावत या लोकप्रिय फ्रँचायझीची धुरा आपल्या हाती घेतली आहे.

विक्रमी व्यवहार आणि नवे भागीदार

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने (USL) दिलेल्या माहितीनुसार, 1.78 अब्ज डॉलर्स (सुमारे 16,706 कोटी रुपये) या विक्रमी किमतीत हा व्यवहार झाला आहे. या कन्सोर्टियममध्ये खालील बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

Advertisement
  • आदित्य बिर्ला ग्रुप (ABG)
  • ब्लॅकस्टोन (Blackstone): जागतिक गुंतवणूक फर्म
  • बोल्ट व्हेंचर्स (Bolt Ventures): अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्झर यांची कंपनी.
  • टाइम्स ऑफ इंडिया (Times Group): प्रसिद्ध मीडिया समूह.

काय संघाचे नाव बदलणार?

मालकी बदलल्यानंतर चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न होता की, 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' हे नाव बदलणार का? मात्र, आदित्य बिर्ला समूहातील महत्त्वाचा चेहरा असलेल्या अनन्या बिर्ला यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अनन्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट रीपोस्ट केली आहे. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की RCB चे नाव बदलले जाणार नाही. संघाची ओळख आणि 'ब्रँड व्हॅल्यू' जपण्यासाठी हे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा)

पुरुष आणि महिला (WPL) दोन्ही संघांची विक्री

या व्यवहारामुळे केवळ पुरुषांच्या आयपीएल टीमचीच नव्हे, तर महिला प्रीमियर लीग (WPL) मधील बेंगळुरू संघाचीही मालकी बदलली आहे. 'रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' (RCSPL) च्या 100% इक्विटी स्टेकची ही विक्री पूर्णतः रोख स्वरूपात झाली आहे.

(नक्की वाचा-  Cylinder Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? केंद्र सरकारने परिपत्रक जारी करत स्पष्ट सांगितलं)

2025 च्या विजेतेपदाचा फायदा?

नोव्हेंबर 2025 मध्ये सुरू झालेली ही स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने 2025 मध्ये आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले, ज्यामुळे या फ्रँचायझीची किंमत आकाशाला भिडली आणि ती आयपीएलमधील सर्वात महागडी टीम बनली.
 

Topics mentioned in this article