जाहिरात

RCB vs CSK : बंगळुरूमध्ये सीएसकेविरूद्धची मॅच सर्वाधिक थरारक, विराट कोहलीने सांगितला अनुभव

RCB vs CSK : आयपीएल 2025 मध्ये आज ( शनिवार 3 मे 2025 ) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे.

RCB vs CSK : बंगळुरूमध्ये सीएसकेविरूद्धची मॅच सर्वाधिक थरारक, विराट कोहलीने सांगितला अनुभव
मुंबई:

Virat Kohli on Chennai Super Kings : IPLमध्ये जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) ची टीम चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) शी बंगळुरूमध्ये भिडते तेव्हा तो सामना सगळ्यात जास्त थरारक असतो असे RCBचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने म्हटले आहे. आयपीएल 2024 मध्ये जेव्हा आरसीबी आणि सीएसकेचा ने बंगळूरुमध्ये सामना झाला होता. तो सामना बंगळुरूच्या टीमने जिंकला होता. आरसीबीने, सीएसकेला 27 धावांनी पराभूत करत  प्लेऑफमधील आपली जागा निश्चित केली होती. IPL 2025 च्या सुरुवातीलाच हे दोन संघ एकमेकांना भिडले होते. हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेलवण्यात आला होता. हा सामना देखील  आरसीबीने जिंकला होता. या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा 50 रन्सनी पराभव केला होता.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोहलीने एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की “जर मला विचारलं की कोणत्या टीमसोबतचा मुकाबला हा थरारक आणि कठीण असतो तर तर मी त्याचं उत्तर चेन्नई सुपर किंग्ससोबतचा सामना असं देईन, खासकरून हा सामना जेव्हा बंगळूरुमध्ये असतो तेव्हा तो सामना अधिकच थरारक असतो.  सीएसकेच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे आणि हे चाहते देशाच्या कोणत्याही मैदानात सामना असो तिथे असताताच.

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही? )

त्यामुळे सीएसके आणि आरसीबीचा सामना जेव्हा बंगळुरुमध्ये खेळवण्यात येतो तेव्हा तिथले वातावरण हे अवर्णनीय असते, कारण चेन्नईचे चाहते मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी मैदानात आलेले असतात. हे चाहते फार आधीपासून तिकीटं काढून ठेवतात आणि मैदानातील एक मोठा भाग या चाहत्यांनी व्यापलेला असतो. यामुळेच हा सामना अत्युंत उत्कंठावर्धक आणि थराराक होतो.”

( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )

आयपीएल 2025 मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 443 धावा केल्या आहेत.  कोहलीने 2008 मधील पहिल्या आयपीएल हंगामातील त्याचे अनुभव सांगितले. त्याने म्हटले की, “पहिल्या वर्षी खूप उत्साह होता, कारण सगळं काही नवीन आणि अनपेक्षित होते. त्यावेळी आम्ही  इतक्या T20 मॅच खेळलो नव्हतो. 

 फ्रँचायझी क्रिकेटमुळे जगभरातील मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. त्यावर्षीच्या आयपीएलसाठी लिलाव झाला , तेव्हा आम्ही मलेशियातील क्वालालंपूरमध्ये होतो. प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू असल्याने माझ्यासाठी 20 लाखांची बोली लागली होती. त्यावेळी खूप आनंद झाला होता, मात्र पुढे काय होणार आहे हे माहिती नव्हते. ओपनिंग सेरेमनीच्यावेळी दिग्गज क्रिकेटपटूंना पाहणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. ”

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: