न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट स्रीरिजमध्ये व्हाईट वॉश मिळाल्यानंतर आता टीम इंडिया वनडे सामने खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाचे खेळाडून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी ऋषभ पंत देखील ऑस्ट्रेलियाला गेला. ऋषभ पंतचा काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, ऋषभ पंत कारमधून उतरताना दिसत आहे. आपल्या आईच्या पाया पडून ऋषभ एअरपोर्टच्या दिशेने रवाना होताना दिसत आहे. @airHostess_Ashi नावाच्या एका यूजनरे ऋषभचा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओद्वारे ऋषभच्या टीशर्टची किंमत काय आहे हे देखील सांगून टाकलं.
(नक्की वाचा- डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन!)
ऋषभ काळ्या रंगाचं टी- शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसत आहे. या टीशर्टची किंमत 42 हजार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र एनडीटीव्ही याबाबत पुष्टी करत नाही.