न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट स्रीरिजमध्ये व्हाईट वॉश मिळाल्यानंतर आता टीम इंडिया वनडे सामने खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाचे खेळाडून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी ऋषभ पंत देखील ऑस्ट्रेलियाला गेला. ऋषभ पंतचा काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, ऋषभ पंत कारमधून उतरताना दिसत आहे. आपल्या आईच्या पाया पडून ऋषभ एअरपोर्टच्या दिशेने रवाना होताना दिसत आहे. @airHostess_Ashi नावाच्या एका यूजनरे ऋषभचा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओद्वारे ऋषभच्या टीशर्टची किंमत काय आहे हे देखील सांगून टाकलं.
(नक्की वाचा- डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन!)
Rishabh Pant ahead of ICT tour to Australia for BGT.
— Anshu Aashi (Air Hostess) (@airHostess_Ashi) November 7, 2024
He has been the impactful performer in recent matches in any condition
Many of his fellow cricketers had appreciated his knock and added " No plans work for Rishabh Pant, when he is batting."
T-shirt is nice & cost 42k pic.twitter.com/DZ0wGPZu4o
ऋषभ काळ्या रंगाचं टी- शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसत आहे. या टीशर्टची किंमत 42 हजार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र एनडीटीव्ही याबाबत पुष्टी करत नाही.
( नक्की वाचा : Rishabh Pant : ऋषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय का घेतला? उघड झालं कारण )
न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. एकीकडे भारतीय फलंदाजांना एक-एक धाव काढण्यासाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजींना जेरीस आणलं. तर दुसरीकडे ऋषभ पंतने चांगली कामगिरी करत सीरिजमध्ये आपली छाप सोडली. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही ऋषभ चांगली कामगिरी करेल अशी आशा टीम मॅनेजमेंट आणि फॅन्सना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world