भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चेन्नईत रविवारी (22 सप्टेंबर) झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं बांगलादेशचा 280 रन्सनी दणदणीत पराभव केला. बांगलादेशची क्रिकेट टीम पाकिस्तानवरुची टेस्ट सीरिज जिंकून भारतामध्ये आली होती. या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावला होता. भारतालाही पराभूत करु, अशी आशा त्यांचा कॅप्टन नजमूल हसन शांतोनं व्यक्त केली होती. बांगलादेशचं हवेत असलेलं विमान टीम इंडियानं जमिनीवर आणलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताकडून या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये ऑल राऊंडर आर. अश्विननं 113 रन काढले. तसंच त्यानंतर एका 6 विकेट्स घेतल्या. शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनीही सेंच्युरी झळकावत विजयात मोलाचं योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्माची बॅटिंग चालली नाही. रोहित बॅटिंगमध्ये अयशस्वी झाला, पण त्याची कॅप्टनसी हिट ठरली. रोहितचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
( नक्की वाचा : चेन्नई टेस्टमध्ये विराटनं केली भर मैदानात चूक, फॅन्स ते रोहित शर्मा सर्वांनाच धक्का )
रोहितनं काय केलं?
बांगलादेशची दुसरी इनिंग सुरु होती. या इनिमंगमधील 56 व्या ओव्हरमध्ये रोहित स्टंपजवळ आला. त्यानं बेल्सची अदलाबदल केली. तो इतक्यावरच थांबला नाही. रोहित स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी उभा राहिला. त्यानं जादू करताना करतात तशी छू मंतरची कृती केली. रोहितची ही विनोदी कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रोहितनं मैदानात जादू केली, असं क्रिकेट फॅन्स गमतीनं म्हणत आहेत. रोहितपूर्वी विराट कोहलीनंही एकदा मैदानात बेल्सची अदलाबदल केली होती.
The win you know, the juju you don't 😆 pic.twitter.com/JPETlsRsGn
— S🦦 (@Iwillhuntuhdown) September 22, 2024
रोहितच्या या कृतीचा टीम इंडियाला लगेच फायदा झाला. आर. अश्विननं पुढच्याच ओव्हरमध्ये मेहदी हसन मिराजला आऊट करत टीम इंडियाला सातवं यश मिळवून दिलं. बांगलादेशीच दुसरी इनिंग त्यानंतर थोड्याच वेळात 234 रनवर संपुष्टात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world