कॉमेन्ट्री असो की खेळाडूंना सल्ला देताना माजी दिग्गज क्रिकेटपटून सुनील गावस्कर नेहमीच रोखठोक भूमिका मांडतात. टीम इंडियाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीवरही सुनील गावस्कर यांनी खेळाडूंबाबत परखड भूमिका मांडली. रोहित शर्मा देखील सुनील गास्वकर यांनी टीका केली होती. मात्र ही टीका रोहितच्या जिव्हारी लागल्याचं समोर आलं आहे. कारण रोहितने याबाबत थेट बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाच्या पराभवानंतर रोहितने बीसीसीआयसोबतच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. बैठकीत रोहितने गावस्कर यांच्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जास्त नकारात्मक वक्तव्य केल्याचा आरोप केला. गावस्कर यांनी इतक्या कठोर शब्दांत टीका करायला नको होती, असे रोहितला वाटल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच रोहितने याबाबत बोर्डाकडे तक्रार केली.
(नक्की वाचा- रोहित शर्माचे पुनरागमन फेल, जम्मू काश्मीरकडून गतविजेत्या मुंबईचा धक्कादायक पराभव)
सुनील गावस्कर यांनी काय म्हटलं होतं?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान एका कॉलममध्ये गावस्कर यांनी लिहिले होते की, 'कर्णधार रोहित शर्माची कामगिरी चांगली नाही आणि खराब फॉर्ममुळे पदावरून पायउतार होण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधील आपल्या भविष्याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित केले. रोहित पर्थमधील पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करायला हवे होते, असेही गावस्कर यांनी म्हटले होते.
( नक्की वाचा : रोहित शर्माला काय झालंय? जम्मू काश्मीरनं काढली उरली-सुरली लाज )
जानेवारीच्या सुरुवातीला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या समारंभात वानखेडे स्टेडियमवर रोहित आणि सुनील गावस्कर एकाच मंचावर दिसले होते. यानंतर रोहितने सुनील गावस्कर यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world