
Arjun Tendulkar's Fiancee Saaniya Chandok: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar's son Arjun gets engaged to Saaniya Chandok) मुंबईतील एका खासगी समारंभात सानिया चंडोकसोबत साखरपुडा झाला आहे. ही बातमी उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र एकच चर्चासुरु आहे. सर्वांनाच अर्जुनची होणारी पत्नी आणि पत्नीबद्दल आणि तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
अर्जुनची होणारी बायको सानिया सानिया पाळीव प्राण्यांच्या (pet) देखभाल उद्योगाशी संबंधित आहे आणि ती मुंबईतील प्रीमियम पाळीव प्राण्यांच्या देखभाल आणि रिटेल ब्रँड मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोर एलएलपीची (Mr. Pawz Pet Spa & Store LLP) संस्थापक आहे. सानिया प्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात आहे. (Who is Arjun Tendulkar's fiance Saaniya Chandok's grandfather)
कोण आहेत रवी घई?
सचिन तेंडुलकरचे भावी सासरे आणि सानियाचे वडील रवी घई हे हे ग्रेविस ग्रुपचे (Gravis Group) प्रमुख आहेत. हा ग्रुप आदरातिथ्य आणि खाद्य उद्योगातील सेवांसाठी प्रसिद्ध आहे. घई यांचे कुटुंब इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल (Intercontinental Hotel) आणि ब्रुकलिन क्रीमेरीशी (Brooklyn Creamery) देखील जोडलेले आहे. 1967 मध्ये भारतात परतण्यापूर्वी, घई यांनी कॉर्नेल विद्यापीठाच्या (Cornell University) हॉटेल प्रशासन शाळेतून पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी वडील इक्बाल कृष्ण घई यांच्याकडून कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला.
( नक्की वाचा : Who Is Saaniya Chandhok :सचिन तेंडुलकरची होणारी सून कोण आहे? किती कमावते? अर्जुनच्या भेटीची अनोखी कहाणी )
त्यानंतर, त्यांनी 'क्वालिटी आईस्क्रीम' (Kwality Ice Cream) हा ब्रँड लाँच केला. भारताला चॉकलेट बार, मॅंगो डुएट आणि कसाटाची (Chocolate bar, Mango Duet and Cassata) ओळख करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बास्किन-रॉबिन्स या प्रसिद्ध आईस्क्रीम बँडची फ्रँचायझीही त्यांनी सार्क देशात आणली होती.
सध्या, ते ग्रेविस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे (Gravis Hospitality Limited) गैर-कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि क्वालिटी रीड एस्टेट्स प्रायव्हेट लिमि
टेड (Kwality Read Estates Private Limited) आणि परफेक्ट लाइव्हस्टॉक एलएलपी (Perfect Livestock LLP) यांसारख्या अनेक संचालक पदांवर कार्यरत आहेत. घई यांच्या ग्रेविस फूड सोल्युशन्सचे (Gravis Food Solutions) आर्थिक वर्ष 24 (FY24) मध्ये 624 कोटी रुपयांचे उत्पन्न होते, ज्यात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 20% वाढ झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world