Sachin Tendulkar And Vinod Kambli Viral Video : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघंही त्यांच्या उत्कृष्ट खेळीसाठी ओळखले जायचे आणि आजही त्यांची क्रेझ क्रिकेटप्रेमींमध्ये कायम आहे. तेंडुलकर आणि कांबळीच्या मैत्रीचे किस्सेही सर्वश्रुत आहेत. सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर गाठले पण विनोद कांबळी काही कारणास्तव मोठे यश मिळवू शकला नाही. पण मैदानात जोपर्यंत हे दोघंही एकत्रित सामने खेळले, तोपर्यंत चाहत्यांनी या जोडीवर भरभरून प्रेम केले. त्यांच्या काळात या दोघांनी काही जाहिरातींमध्येही एकत्रित शुटिंग केले. या दोघांच्या जाहिराती खूप मनोरंजक होत्या. नव्वदच्या दशकातील त्यांची अशीच एक जाहिराती आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जाहिरातीत असा होता दोघांचा अंदाज
जाहिरातीत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघंही क्रिकेटच्या मैदानात दिसत आहेत. सचिन बॉलिंग तर विनोद बॅटिंग करत असतो. सचिन विनोदला क्लीन बोल्ड करतो. यानंतर सचिन तेंडुलकर मित्राला चिअरअप करण्यासाठी पेप्सी प्यायला जाऊ असे म्हणतो. यानंतर दोघंही पेप्सी ठेवलेल्या रूमच्या दिशेने जातात. गंमत म्हणजे फ्रीजमध्ये एकच पेप्सीची बाटली असते. मग पेप्सीची बाटली जिंकण्यासाठी ते दोघं पंजा लढवतात.
(नक्की वाचा : सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप)
जाहिरातीतील ट्विस्ट
दोघंही पंजा लढवत असतात. पण यादरम्यान मोहम्मद अजहरुद्दीन तेथे येऊन पेप्सीची पूर्ण बाटली संपवून जातो. यानंतर दोघंही मित्र एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसतात. असा ट्विट जाहिरातीत पाहायला मिळतो. दरम्यान जेव्हा ही जाहिरात चित्रित करण्यात आली होती, त्यावेळेस मोहम्मद अजहरुद्दीन टीम इंडियाचे कॅप्टन होते.
(नक्की वाचा : बोलणंही होतं कठीण तरीही गाणं गाऊन विनोद कांबळीने जिंकले मन, खास मित्र तेंडुलकरने वाजवल्या टाळ्या)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world