
Sachin Tendulkar on Arjun Tendulkar and Saaniya Chandok Engagement: सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं आहे. बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर या बातमीची चर्चा सुरू होती, पण सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी यावर मौन बाळगले होते. आता खुद्द मास्टर ब्लास्टरने ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. अर्जुन आणि सानियाचा 13 ऑगस्ट 2025 रोजी साखरपुडा झाला. लवकरच ते विवाहबंधनात अडकतील अशी शक्यता आहे.
काय म्हणाला सचिन?
रेडिटच्या "आस्क मी एनीथिंग" सेशनमध्ये जेव्हा सचिन यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिले, 'हो, त्यांचा साखरपुडा झाला आहे आणि या नव्या प्रवासासाठी आम्ही सर्व खूप आनंदी आणि उत्साही आहोत.'
( नक्की वाचा : Rahul Dravid : सचिन तेंडुलकरचा 'तो' सल्ला ऐकल्याचा पश्चाताप, राहुल द्रविडनं बोलून दाखवली खंत )
कोण आहे सानिया?
सानिया चंडोक देशातील प्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात आहेत. घई कुटुंबीय फाइव्ह स्टार इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी सारख्या व्यवसायांमध्ये सक्रिय आहे, जे आरोग्यदायी आइसक्रीम आणि फ्रोजन डेझर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त, 'ग्रॅविस गुड फूड्स' देखील घई कुटुंबाचाच व्यवसाय आहे.
एका प्रसिद्ध कुटुंबातून येत असूनही सानियाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती मुंबईतील एका प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर 'मिस्टर पॉज' ची संस्थापक आहे.
( नक्की वाचा : Saaniya Chandhok : होणाऱ्या सुनबाईसोबत दिसला सचिन तेंडुलकर, फोटो आणि व्हिडिओ Viral )
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी
सानिया चंडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ती अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरची खूप खास मैत्रीण आहे. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो एकत्र दिसतात.
अर्जुन तेंडुलकरचे क्रिकेट करिअर
25 वर्षीय अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. त्याचबरोबर तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. मात्र, IPL 2025 मध्ये त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world