जाहिरात

Smriti Mandhana Marriage: स्मृती मंधाना लग्न कधी करणार? बॉयफ्रेंड पलाशनं दिलं थेट उत्तर

Smriti Mandhana Marriage: भारतीय महिला क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन आणि स्टार ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या खेळासोबतच खासगी आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मंधाना लग्न कधी करणार? बॉयफ्रेंड पलाशनं दिलं थेट उत्तर
Smriti Mandhana Marriage: स्मृती मंधाना लवकरच इंदूरची सून होणार आहे.
मुंबई:

Smriti Mandhana Marriage: भारतीय महिला क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन आणि स्टार ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या खेळासोबतच खासगी आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे. स्मृती आणि संगीत दिग्दर्शक-फिल्ममेकर पलाश मुछाल (Palash Muchhal) यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, आता खुद्द पलाश मुछाल यांनी एका कार्यक्रमात 'लवकरच लग्न करणार' असल्याचे संकेत देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

"स्मृती लवकरच इंदूरची सून होईल!''

पलाश मुछालने त्याच्या मूळ गावी इंदूरमध्ये (Indore) स्टेट प्रेस क्लबच्या 'रू-ब-रू' कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. स्मृती मंधानासोबतच्या खास नात्याबद्दल विचारले असता, पलाश यांनी हसत हसत एक मोठी 'हेडलाईन' दिली.

30 वर्षीय पलाश मुछालनं सांगितलं, "ती (स्मृती मंधाना) खूप लवकर इंदूरची सून होईल... मला फक्त एवढंच सांगायचं आहे." पलाश यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. "मी तुम्हाला हेडलाईन दिली आहे," असे हसून ते म्हणाले.

विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध 19 ऑक्टोबरला होणाऱ्या आयसीसी महिला वन डे विश्वचषक (ICC Women's ODI World Cup) सामन्यासाठी व्हाईस कॅप्टन स्मृती मंधाना सध्या इंदूरमध्येच आहे आणि याच वेळी पलाश यांनी हा मोठा संकेत दिला आहे.

( नक्की वाचा : स्मृती मंधनाचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळ, दमदार सेंच्युरीसह विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड )
 

कोण आहे पलाश मुछाल?

स्मृती मंधाना (वय 27) चा बॉयफ्रेंड पलाश मुछाल (वय 29) हा संगीतकार (Music Composer) आणि चित्रपट निर्माता (Filmmaker) आहेत. त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांना संगीत दिले आहे. पलाश मुछाल मूळचा इंदूरचा रहिवासी आहे.

स्मृती मंधाना आणि पलाश मुछाल यांच्या वयात केवळ 2 वर्षांचा फरक आहे. स्मृती 27 वर्षांची आहे, तर पलाश 29 वर्षांचे आहेत.

पलाश मुछाल यांची मोठी बहीण पलक मुछाल (Palak Muchhal) यादेखील प्रसिद्ध बॉलिवूड गायिका (Bollywood Singer) आहेत. त्यांनी सलमान खान आणि हृतिक रोशन यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

पलाश मुछालची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये ते 41 कोटी रुपये यांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. पलाश सध्या त्यांच्या 'राजू बाजे वाला' (Raju Baje Wala) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये आहेत. या चित्रपटात 'बालिका वधू' फेम अविका गौर (Avika Gor) आणि 'पंचायत' वेब सिरीजमधील चंदन रॉय (Chandan Roy) प्रमुख भूमिकेत आहेत.

( नक्की वाचा : कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )
 

स्मृतीला दिल्या शुभेच्छा

पलाश मुछालने यावेळी  भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, "माझ्या सदिच्छा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्मृती (मंधाना) यांच्यासोबत आहेत. भारतीय क्रिकेट टीमनं प्रत्येक सामना जिंकावा आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आमची नेहमीच इच्छा असते."

पलाशच्या या अप्रत्यक्ष पण स्पष्ट खुलाशानंतर आता स्मृती मंधाना आणि पलाश मुछाल कधी लग्नबंधनात अडकणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com